
फोटो सौैजन्य: @AarizRizvi/ X.com
Thar Roxx Star Edn मध्ये पियानो ब्लॅक ग्रिल आणि पियानो ब्लॅक फिनिश असलेले 19-इंच अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. हे अपडेट्स स्टँडर्ड Thar Roxx व्हेरिएंट्सपेक्षा या एडिशनला अधिक खास आणि प्रीमियम लूक देतात.
20 मिनिटात 80% चार्ज आणि 810 किमीची तुफान रेंज! ‘या’ देशात नवीन Volvo EX60 सादर
या स्पेशल एडिशनचे इंटीरियर पूर्णपणे ऑल-ब्लॅक थीमवर आधारित आहे. यामध्ये ऑल-ब्लॅक लेदरेट अपहोल्स्ट्रीसोबत Suede अॅक्सेंट्स देण्यात आले आहेत. कंपनीनुसार, या बदलांमुळे केबिनचा एम्बियन्स आणि प्रीमियम फील अधिक उंचावतो.
Mahindra ने Thar Roxx Star Edn विविध रंगांमध्ये सादर केली आहे. यामध्ये सिट्रीन येलो (नवीन हीरो कलर), टॅंगो रेड, एव्हरेस्ट व्हाइट, आणि स्टेल्थ ब्लॅक. अशा या रंग पर्यायांचा समावेश आहे.
Thar Roxx Star Edn मध्ये ग्राहकांच्या ‘मोस्ट वॉन्टेड’ फीचर्सना एकत्र बंडल करण्यात आले आहे. कंपनीने हे फीचर्स वेगवेगळ्या कॅटेगरीत विभागले आहेत.
Mahindra Thar Roxx Star Edn तीन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे