Mahindra Vision X SUV Concept सादर फोटो सौजन्य: @BunnyPunia (X.com)
भारतात नेहमीच इतर सेगमेंटमधील वाहनांपेक्षा एसयूव्हीला चांगली मागणी मिळताना दिसते. तसेच, अनेक उच्च श्रीमंत व्यक्ती सध्या आपल्या कार कलेक्शनमध्ये एसयूव्ही कार्सचा समावेश करत असते. भारतात अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या बेस्ट परफॉर्मन्स देणाऱ्या एसयूव्ही कार ऑफर करत असतात. यात सर्वात पहिले नावं महिंद्राचे येते. महिंद्राने भारतात ग्राहकांना भुरळ पडेल अशा दमदार एसयूव्ही लाँच केल्या आहेत. इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये सुद्धा त्यांनी एसयूव्ही ऑफर केल्या आहेत.
महिंद्राने 15 ऑगस्ट रोजी मुंबईत Freedom NU कार्यक्रमात त्यांची नवीन महिंद्रा व्हिजन एक्स एसयूव्ही कॉन्सेप्ट सादर केली आहे. या कॉन्सेप्टचे डिझाइन महिंद्राच्या पारंपारिक बॉक्सी आणि मस्क्युलर लूकपेक्षा थोडे वेगळे आहे. याचा लूक अगदी फ्यूचरिस्टिक दिसतो. यासोबतच, ही एसयूव्ही Vision T, Vision S आणि Vision SXT पेक्षा वेगळी दिसते.
लवकरच Mahindra BE6 Black Edition चे आगमन होणार, मिळणार फास्ट चार्जिंग आणि लॉन्ग रेंज
ही बी-एसयूव्ही सेगमेंटमध्ये म्हणजेच सब-4 मीटर एसयूव्ही सेगमेंटमध्ये आणली जाणार आहे. याचा लूक बॉक्सी नाही, तर स्लीक आणि एरोडायनामिक आहे. याच्या पुढच्या बाजूला स्प्लिट एलईडी हेडलाइट सेटअप, वर डीआरएल आणि खाली व्हर्टिकल एलईडी प्रोजेक्टर आहे. त्यांच्यामध्ये एक मोठी ग्रिल आहे, ज्यावर एक्स पॅटर्न आहे आणि वर महिंद्राचा ट्विन पीक्स लोगो आहे. जे पाहून असे म्हणता येऊ शकते की ही एसयूव्ही आयसीई व्हर्जनमध्ये आणली जाईल.
या एसयूव्हीच्या साइड प्रोफाइलबद्दल बोलायचे झाले तर, क्लॅमशेल बोनेट, फ्लश डोअर हँडल, फ्लोटिंग रूफ इफेक्ट, रूफ रेल, जाड सी-पिलर, स्क्वेअर व्हील आर्च, ब्लॅक बॉडी क्लॅडिंग आणि ड्युअल-टोन अलॉय व्हील्स सारखी फीचर्स देण्यात आली आहेत. तिच्या मागील बाजूला, स्प्लिट रूफ स्पॉयलर, कनेक्टेड एलईडी टेललाइट आणि व्हर्टिकल रिफ्लेक्टरसह स्पोर्टी बंपर आहे.
Fastag Annual Pass: कसा मिळेल नवा पास, किती होईल बचत? जाणून घ्या सर्वकाही
याच्या केबिनचे डिझाइन पूर्णपणे फ्यूचरिस्टिक आहे. यात ट्विन 12.3-इंच डिस्प्ले सेटअप आहे, ज्यापैकी एक इन्फोटेनमेंटसाठी असेल आणि दुसरा इन्स्ट्रुमेंटेशनसाठी असेल. यातील आणि गियर शिफ्टर स्टीयरिंग कॉलममध्ये शिफ्ट करता येते. तसेच डबल डी-कट स्टीयरिंग, HUD डिस्प्ले आणि ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोलसाठी वेगळे स्क्रीन देखील पाहता येईल.
या एसयूव्हीचे प्रोडक्शन व्हर्जन ICE SUV असू शकते, ज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्याय तसेच मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स दिसू शकतात. यासोबतच, BE 6 प्रोडक्शन मॉडेलप्रमाणे, त्याच्या कॉन्सेप्ट डिझाइनमधील बहुतेक एलिमेंट्स प्रोडक्शनमध्ये येऊ शकतात.