
फोटो सौजन्य: Pinterest
महिंद्राने आपल्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही XUV 3XO च्या किमती वाढवल्या आहेत. रिपोर्ट्सनुसार, या कारच्या किमतीत कमाल 17 हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. वेगवेगळ्या व्हेरिएंट्सनुसार ही वाढ वेगवेगळी आहे.
फुल टॅंकवर 800 किमीची धावण्याची हमी! ‘ही’ आहे देशातील सर्वात स्वस्त डिस्क ब्रेक बाईक
मिळालेल्या माहितीनुसार, 1.5 लिटर टर्बो डिझेल ऑटोमॅटिक (AMT) AX7 आणि 1.5 लिटर टर्बो डिझेल मॅन्युअल AX7 L या व्हेरिएंट्सच्या किमतीत सर्वाधिक म्हणजेच सुमारे 17,200 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
XUV 3XO चा बेस व्हेरिएंट म्हणून MX1 उपलब्ध आहे. या 1.2 लिटर पेट्रोल मॅन्युअल व्हेरिएंटच्या किमतीत 8,200 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
आता पेट्रोल आणि डिझेलशिवाय धावणार Tata Sierra! लवकरच येतंय नवीन व्हर्जन
Mahindra XUV 3XO ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये उपलब्ध असून, या सेगमेंटमध्ये तिची स्पर्धा Maruti Brezza,Tata Nexon,Kia Sonet, Kia Syros, आणि Hyundai Venue या गाड्यांशी होते.