फोटो सौजन्य: iStock
जर तुम्ही सुद्धा कार खरेदीसाठी संपूर्ण बजेट प्लॅन करून बसला आहात तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. सध्या भारतीय मार्केटमध्ये कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या सेगमेंट वेगाने वाढ होत आहे. 2025 च्या उर्वरित महिन्यांत आणि पुढील वर्षाच्या सुरुवातीला, अनेक मोठ्या ऑटो कंपन्या या सेगमेंटमध्ये नवीन मॉडेल्स आणि अपडेटेड व्हर्जन लाँच करण्याची तयारी करताय. त्यापैकी सर्वात लोकप्रिय म्हणजे Maruti Suzuki Fronx Hybrid, नवीन Hyundai Venue आणि Tata Punch Facelift.. चला या कार्सबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी 2025 मध्ये त्यांच्या लोकप्रिय एसयूव्ही फ्रॉन्क्सची हायब्रिड व्हर्जन लाँच करणार आहे. ही कार 1.2-लिटर Z12E पेट्रोल इंजिन, 1.5-2 kWh बॅटरी पॅक आणि इलेक्ट्रिक मोटरसह मजबूत हायब्रिड पॉवरट्रेन (HEV) मध्ये येईल. याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही 35 किमी प्रति लिटरपेक्षा जास्त मायलेज देण्याचा दावा करते, ज्यामुळे या सेगमेंटमधील ही कार सर्वात किफायतशीर एसयूव्ही बनते.
फीचर्सच्या बाबतीत पाहिले तर, या गाडीत लेव्हल 1 ADAS, 6 एअरबॅग्ज, 360-डिग्री कॅमेरा आणि सनरूफ मिळण्याची शक्यता आहे. डिझाइनमध्ये काही किरकोळ सुधारणा केल्या जाणार असून त्यात नवीन ग्रिल, अपडेटेड हेडलॅम्प्स आणि अधिक आकर्षक केबिन लेआउटचा समावेश असेल. या मॉडेलची अपेक्षित किंमत 8 लाख ते 13 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान असू शकते.
ह्युंदाई 2025 च्या अखेरीस त्यांच्या लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्ही व्हेन्यूचे नवीन जनरेशनचे मॉडेल लाँच करण्याची योजना आखत आहे. त्यात स्प्लिट हेडलॅम्प, पॅरामीट्रिक ग्रिल आणि कनेक्टेड एलईडी टेललॅम्पसह एक नवीन बॉक्सी डिझाइन मिळेल, जे त्याला अधिक प्रीमियम लूक देईल. सध्याच्या इंजिन पर्याय राहतील.
दिवाळीत मोदी सरकार GST कमी करणार? काय असेल Maruti Alto, Swift, Dzire आणि WagonR ची नवी किंमत?
या कारमध्ये लेव्हल 2 एडीएएस, 360-डिग्री कॅमेरा, व्हेंटिलेटेड सीट्स आणि 10.25-इंच ड्युअल डिस्प्ले सारख्या प्रगत फीचर्स समावेश केला जाऊ शकतो. त्याचे केबिन देखील पुन्हा डिझाइन केले जाईल, ज्यामध्ये एक नवीन डॅशबोर्ड आणि अपडेटेड अपहोल्स्ट्री दिसेल. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, नवीन व्हेन्यूची किंमत 7.5 लाख ते 13 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान असू शकते.
यंदाच्या दिवाळी आधीच टाटा मोटर्स त्यांच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या एसयूव्ही पंचचे फेसलिफ्ट मॉडेल लाँच करण्याची तयारी करत आहे. यावेळी पंचला ईव्ही व्हेर्जनपासून प्रेरित डिझाइन मिळेल, ज्यामध्ये नवीन एलईडी डीआरएल, स्लिम हेडलॅम्प आणि पुन्हा डिझाइन केलेले बंपर असतील. इंटिरिअरमध्ये टू-स्पोक स्टीअरिंग व्हील, मोठे टचस्क्रीन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि टच-आधारित एचव्हीएसी कंट्रोल सारखी फीचर्स असतील. या कारची किंमत 6 लाख ते 10 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान असण्याची अपेक्षा आहे. ही एसयूव्ही थेट ह्युंदाई एक्स्टर आणि मारुती फ्रॉन्क्सशी स्पर्धा करेल.