
फोटो सौजन्य: @JainsMahindra/ X.com
भारतात गेल्या अनेक वर्षांपासून SUV सेगमेंटमध्ये Mahindra च्या कार लोकप्रिय ठरत आहे. आता महिंद्रा त्यांच्या लोकप्रिय एसयूव्ही लाइनअपला एका नवीन लेव्हलवर नेण्याची तयारी करत आहे. कंपनी 5 जानेवारी 2026 रोजी नवीन महिंद्रा XUV 7XO चे सादर लाँच आहे. लाँचिंगला फक्त काही दिवस शिल्लक असताना, महिंद्रा एसयूव्हीच्या प्रमुख फीचर्सची झलक देण्यासाठी सतत टीझर रिलीज करत आहे. XUV 7XO मध्ये अनेक प्रभावी फीचर्स असतील. चला याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
XUV 7XO मधील सर्वात मोठे आणि सर्वात विशेष अपडेट म्हणजे त्याची 540-डिग्री कॅमेरा सिस्टम. XUV700 मध्ये 360-डिग्री कॅमेरा देण्यात आला असला तरी, नवीन सिस्टम ड्रायव्हरला त्याच्या सभोवतालचे अधिक व्यापक दृश्य दाखवते. पार्किंग करताना आणि अरुंद जागांमध्ये कार चालवताना हे फायदेशीर ठरेल, ज्यामुळे ड्रायव्हरची व्हिसिबिलीटी सुधारेल.
‘या’ गोष्टींमुळे New Kia Seltos जुन्या जनरेशनपेक्षा एक पाऊल पुढे आहे
महिंद्राने XUV 7XO मध्ये मागील सीटवरील प्रवाशांसाठी इन-कार थिएटर मोडची देखील पुष्टी केली आहे. हे फिचरमुळे प्रवासी त्यांचे वैयक्तिक डिव्हाइस कनेक्ट करून कंटेंट स्ट्रीम करू शकतात. संपूर्ण सिस्टम ॲड्रेनॉक्स प्लस सॉफ्टवेअर सूटद्वारे मॅनेज केले जाईल, जी इन्फोटेनमेंट, कनेक्टिव्हिटी आणि व्हेईकल फंक्शन्स मॅनेज करते.
टीझरमध्ये SUV च्या एक्सटिरिअरमध्ये अनेक महत्त्वाचे बदल स्पष्टपणे दिसून येतात. यात फ्रंट प्रोफाइलमध्ये नव्या डिझाइनचे LED DRLs, प्रोजेक्टर हेडलॅम्प्स आणि व्हर्टिकल क्रोम एलिमेंट्ससह रिफ्रेश्ड ग्रिल देण्यात आले आहे.
रियर डिझाइनबद्दल बोलायचे झाले तर, यात फुल-विड्थ कनेक्टेड टेल-लाइट बार देण्यात आला असून त्यात इन्व्हर्टेड L-शेप एलिमेंट्सचा समावेश आहे. याशिवाय, नव्या ड्युअल-टोन अलॉय व्हील्स, बदललेले बंपर्स आणि नवीन पेंट ऑप्शन्समुळे SUV ला अधिक फ्रेश आणि आकर्षक लूक मिळतो.
Mahindra ची ‘ही’ कार Tata Sierra ची हवा टाइट करणार? टेस्टिंग दरम्यान झाली स्पॉट
Mahindra ने XUV 7XO च्या इंटिरिअरमध्ये मोठे बदल केले आहेत. ही कंपनीची पहिली पेट्रोल-डिझेल SUV असेल, ज्यामध्ये ट्रिपल-स्क्रीन डॅशबोर्ड लेआउट देण्यात येणार आहे.
यासोबतच केबिनमध्ये पॅनोरॅमिक सनरूफ, ट्रिपल-टोन डॅशबोर्ड आणि नवीन सेंटर कन्सोल देण्यात आला आहे. प्रीमियम फीलसाठी सुधारित अपहोल्स्ट्री, रिव्हाइज्ड डोअर ट्रिम्स आणि ब्राउन-टॅन स्टीयरिंग व्हीलचा समावेश करण्यात आला आहे.
टीझरमध्ये दिसणाऱ्या टॉप-स्पेक AX7L व्हेरिएंटमध्ये Boss Mode सीटिंग, नवीन एअर व्हेंट्स आणि इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल ORVMs यांसारखी फीचर्सही पाहायला मिळतात.
Mahindra XUV 7XO मध्ये XUV700 मध्ये मिळणारेच पॉवरट्रेन पर्याय कायम ठेवले जाण्याची शक्यता आहे. यामध्ये 2.0-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन आणि 2.2-लीटर डिझेल इंजिन मिळेल. दोन्ही इंजिन्ससोबत मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचे पर्याय देण्यात येतील. तसेच, निवडक व्हेरिएंट्समध्ये ऑल-व्हील-ड्राइव्ह (AWD) चा पर्यायही उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.