Mahindra Vision S चा डिझाइन खूपच मजबूत आणि बॉक्सी दिसतो. सरळ फ्रंट, फ्लॅट बोनट आणि एकूणच रफ-अँड-टफ SUV लूक यामुळे ती ट्रॅडिशनल SUV ची आठवण करून देते. गोल हेडलॅम्प्स आणि उभ्या रचनेची ग्रिल यामुळे क्लासिक टच मिळतो. Thar Roxx प्रमाणेच यामध्ये LED DRL हेडलाइट्ससोबत इंटिग्रेशन असण्याची शक्यता आहे. टेस्ट मॉडेलमध्ये फ्रंट ग्रिलखाली रडार युनिट दिसून आल्याने, यात ADAS फीचर्स दिले जाण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
2026 मध्ये SUVs चे राज्य! ‘या’ कार मार्केट गाजवण्याचा फुल तयारीत
Vision S चे आणखी एक मोठे फीचर्स म्हणजे त्याचे हाय ग्राउंड क्लीयरेंस. मोठे व्हील्स, जाड टायर्स आणि लांब सस्पेंशनमुळे ही SUV खराब रस्त्यांवरही सहज धावण्यासाठी सज्ज असेल. रिपोर्टनुसार, यात 5-लिंक रिअर इंडिपेंडंट सस्पेंशन देण्यात येऊ शकते. साइड प्रोफाइलमध्ये फ्लश डोअर हँडल्स, रुंद व्हील आर्च आणि सरळ रूफ दिसते. मोठा ग्लास एरिया असल्याने केबिनमधून बाहेरची व्हिसिबिलीटी उत्तम मिळेल.
मागील बाजूला Vision S मध्ये पारंपरिक SUV डिझाइन कायम ठेवण्यात आले आहे. टेलगेटवर लावलेले स्पेअर व्हील तिचा ऑफ-रोड लूक अधिक ठसठशीत करते. आतल्या बाजूला प्रीमियम केबिन देण्यात येणार असल्याची शक्यता आहे. SUV मध्ये मोठा पॅनोरमिक सनरूफ, डॅशबोर्डवर दोन मोठ्या स्क्रीन आणि नवीन ड्युअल-टोन थ्री-स्पोक स्टीयरिंग व्हील दिले जाऊ शकते. केबिनमध्ये सॉफ्ट-टच मटेरियलचा वापर अपेक्षित आहे.
Tata Safari Petrol की MG Hector Plus, पेट्रोल इंजिन असणारी कोणती SUV आहे एकदम क्लास?
Mahindra कडून अद्याप इंजिनविषयी अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र Vision S मध्ये 1.2 लीटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लीटर टर्बो डिझेल इंजिनचे पर्याय मिळू शकतात. पुढील टप्प्यात याचे हायब्रिड आणि इलेक्ट्रिक व्हर्जनही सादर होण्याची शक्यता आहे. लॉन्चनंतर ही SUV Tata Sierra साठी एक मजबूत प्रतिस्पर्धी ठरू शकते.






