फोटो सौजन्य: YouTube
महिंद्रा कंपनीच्या कार्स नेहमीच भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करत असतात. पण आता कंपनीने आपली एक विशेष कार साऊथ आफ्रिकेत लाँच केली आहे. Mahindra XUV3XO असे या लाँच झालेल्या कारचे नाव आहे. साऊथ आफ्रिकेतील ग्राहकांसाठी या कारमध्ये कंपनीने एक विशेष बदल केला आहे.
साऊथ आफ्रिकेत लाँच झालेल्या या कारचे इंटिरिअर आणि एक्सटिरिअर हे भारतात मिळणाऱ्या कार सारखेच आहे, परंतु त्याची केबिनची थीम वेगळी आहे. ही कार फक्त एका इंजिन पर्यायामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. Mahindra XUV3XO च्या दक्षिण आफ्रिकन व्हर्जनमध्ये अजून काय आहे याबद्दल जाणून घेऊया.
हे देखील वाचा: Lexus कडून अचानक थांबवण्यात आली ‘या’ कारची बुकिंग, किमंत तब्बल 2 कोटी
दक्षिण आफ्रिकेत लाँच झालेल्या XUV 3XO ची किंमत R2,54,999 ते R4,04,999 (रु. 12.16 लाख आणि 19.31 लाख) दरम्यान आहे. हे किंमत भारताच्या तुलनेत 4.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. तसेच पूर्णपणे लोड केलेल्या व्हेरिएंटच्या किंमतीत 3.5 लाख रुपयांपेक्षा जास्त फरक आहे.
दक्षिण आफ्रिकेत लाँच केलेली XUV3XO भारतीय मॉडेलसारखी दिसते. यात ऑटो-एलईडी प्रोजेक्टर हेडलाइट्स आणि सी-आकाराचे एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स (डीआरएल) तसेच फ्रंट बंपरमध्ये कॅमेरा आणि सिल्व्हर स्किड प्लेट आहे.
या कारचे इंटीरियर देखील भारतीय व्हर्जनसारखेच आहे, परंतु त्याची केबिन थीम येथून वेगळी आहे. साऊथ आफ्रिकेत लाँच केलेल्या मॉडेलमध्ये ऑल-ब्लॅक केबिन आणि ब्लॅक लेदरेट सीट्स आहेत. त्याच वेळी, येथे उपलब्ध XUV 3XO मध्ये पांढऱ्या लेदरेट सीटसह ड्युअल-टोन ब्लॅक आणि व्हाइट इंटिरिअर आहे.
कारच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ड्युअल 10.25-इंचाचा डिस्प्ले, 7-स्पीकर हरमन कार्डन साउंड सिस्टम आणि मागील व्हेंटसह ड्युअल-झोन एसी तसेच पॅनोरॅमिक सनरूफ, वायरलेस फोन चार्जर आणि हवेशीर फ्रंट सीट्स यांसारखी फीचर्स प्रदान करण्यात आली आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, सहा एअरबॅग्ज, ब्लाइंड व्ह्यू मॉनिटरसह 360-डिग्री कॅमेरा, हिल होल्ड आणि डिसेंट कंट्रोल तसेच इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), ट्रॅक्शन कंट्रोल आणि रोलओव्हर मिटिगेशन प्रदान करण्यात आले आहेत. एवढेच नाही तर ही कार 3-पॉइंट सीटबेल्ट, ऑल-व्हील डिस्क ब्रेक आणि ॲडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, ऑटोनॉमस ब्रेकिंग आणि लेन कीप असिस्ट यांसारख्या ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS) सारख्या फीचर्सनी सुसज्ज आहे.
दक्षिण आफ्रिकेतील Mahindra XUV 3XO मध्ये फक्त 1.2-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन पर्याय आहे. हे इंजिन 111 PS पॉवर आणि 200 Nm टॉर्क जनरेट करते. हे 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह जोडलेले आहे. हा इंजिन पर्याय भारतातही उपलब्ध आहे.