Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कार खरेदीदारांना मोठा झटका! ‘या’ तारखेपासून मारुति सुझुकीच्या गाड्या महागणार; किमतीत तब्बल ३०,००० रुपयांपर्यंत वाढ

Maruti Suzuki Car Price Hike News: देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुति सुझुकीने आपल्या गाड्या महाग करण्याची घोषणा केली आहे. जून २०२६ पासून मारुतीच्या सर्व गाड्यांच्या किमती ३०,००० रुपयांपर्यंत वाढणार आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 21, 2026 | 08:30 PM
कार खरेदीदारांना मोठा झटका! 'या' तारखेपासून मारुति सुझुकीच्या गाड्या महागणार (Photo Credit- X)

कार खरेदीदारांना मोठा झटका! 'या' तारखेपासून मारुति सुझुकीच्या गाड्या महागणार (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • कार खरेदीदारांना मोठा झटका!
  • ‘या’ तारखेपासून मारुति सुझुकीच्या गाड्या महागणार
  • किमतीत तब्बल ३०,००० रुपयांपर्यंत वाढ
Maruti Suzuki Car Price Hike: भारतीय वाहन क्षेत्रातील अग्रगण्य आणि देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी ‘मारुति सुझुकी इंडिया’ (Maruti Suzuki India) ने वाहन खरेदीदारांना मोठा झटका दिला आहे. कंपनीने गुरुवार रोजी जाहीर केलेल्या अधिकृत माहितीनुसार, जून २०२६ पासून मारुतीच्या सर्व गाड्यांच्या किमतीत वाढ केली जाणार आहे. विविध मॉडेल आणि व्हेरिएंटनुसार कारच्या किमती तब्बल ३०,००० रुपयांपर्यंत वाढणार आहेत. कंपनीने स्टॉक एक्स्चेंज फायलिंगमध्ये स्पष्ट केले आहे की, हा दरवाढीचा निर्णय कंपनीच्या सर्व मॉडेल्सवर लागू असेल.

वाहन निर्मितीचा खर्च वाढल्याने दरवाढीचा निर्णय

नियामक फायलिंगमध्ये मारुति सुझुकीने दरवाढीचे मुख्य कारण स्पष्ट करताना सांगितले की, “कार उत्पादनासाठी लागणाऱ्या इनपुट खर्चामध्ये (कच्चा माल आणि परिचालन खर्च) सातत्याने वाढ होत आहे. कच्च्या मालाचे वाढते दर आणि ऑटोमोबाईल उद्योगासमोरील आव्हाने पाहता, जून २०२६ पासून कंपनीच्या सर्व मॉडेल्सच्या किमतीत ३०,००० रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेणे भाग पडले आहे.”

Maruti Suzuki to hike prices across models by up to Rs 30,000 from June 2026: Co filing. pic.twitter.com/lt91tCq79p — Press Trust of India (@PTI_News) May 21, 2026

कंपनीने पुढे सांगितले की, “गेल्या काही महिन्यांपासून उत्पादन खर्च कमी करण्यासाठी विविध पातळीवर अनेक उपाययोजना करण्यात आल्या. वाढत्या खर्चाचा बोजा ग्राहकांवर पडू नये म्हणून कंपनीने बरीच आर्थिक झळ स्वतः सोसली. मात्र, आता महागाईचा दबाव कमालीचा वाढल्याने अंशतः दरवाढ करणे अपरिहार्य झाले आहे.”

नवीन ड्रायव्हर असाल तर गाडी चालवताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर बाराच्या भावात जाल!

विविध मॉडेल्सनुसार नवे दर बदलणार

मारुति सुझुकीने स्पष्ट केले आहे की, ३० हजार रुपयांची ही दरवाढ कमाल मर्यादा असेल. याचा अर्थ असा की, कारच्या वेगवेगळ्या मॉडेल्स (उदा. अल्टो, स्विफ्ट, डिझायर, ब्रेझा किंवा ग्रँड विटारा) आणि त्यांच्या इंजिन किंवा इंधन प्रकारानुसार (पेट्रोल, सीएनजी) ही वाढ वेगवेगळी असणार आहे. बेस मॉडेल्सच्या किमती कमी वाढतील, तर प्रीमियम आणि टॉप-एंड गाड्यांच्या किमतीत जास्त वाढ पाहायला मिळू शकते.

ऑटोमोबाईल क्षेत्राला महागाईचा विळखा

मारुति सुझुकीने केलेली ही घोषणा अशा वेळी आली आहे, जेव्हा देशातील बहुतांश ऑटोमोबाईल कंपन्या कच्च्या मालाच्या वाढत्या किमती, वाहतूक खर्च आणि पुरवठा साखळीतील विस्कळीतपणामुळे त्रस्त आहेत. वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी यापूर्वी अनेक कंपन्यांनी आपल्या गाड्यांचे दर वाढवले आहेत. याआधी, चालू वर्षात ६ एप्रिल रोजी प्रमुख वाहन उत्पादक कंपनी ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ने देखील आपल्या एसयूव्ही (SUV) आणि व्यावसायिक वाहनांच्या किमतीत वाढ जाहीर केली होती. महिंद्राने इनपुट खर्च वाढल्याचे सांगत वाहनांच्या दरात सरासरी १.६ टक्के ते कमाल २.५ टक्क्यांपर्यंत वाढ केली होती. आता मारुतीच्या या घोषणेनंतर आगामी काळात इतर कार कंपन्याही आपल्या गाड्यांचे दर वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबईत 53 लाखांच्यावर वाहने… लोकसंख्येसोबतच वाढत्या वाहनांचा देखील मुंबईकरांना त्रास !

Web Title: Major blow to car buyers maruti suzuki cars to become more expensive from this date

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 08:30 PM

Topics:  

  • auto news
  • car prices
  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

सुझुकी V-Strom SX ला नवा अवतार! ₹2.02 लाखांत मिळणार ड्युअल-टोन कलर
1

सुझुकी V-Strom SX ला नवा अवतार! ₹2.02 लाखांत मिळणार ड्युअल-टोन कलर

5 Affordable Hatchback Cars: दिवाळीत नवीन कार घ्यायचीये? 6 एअरबॅग्ससह ‘या’ 5 कार बजेटमध्ये बसतील
2

5 Affordable Hatchback Cars: दिवाळीत नवीन कार घ्यायचीये? 6 एअरबॅग्ससह ‘या’ 5 कार बजेटमध्ये बसतील

Suzuki SV-7GX! जास्त फीचर्सच्या शर्यतीपासून दूर राहून Suzuki ने बनवली स्मार्ट बाईक! जाणून घ्या खासियत
3

Suzuki SV-7GX! जास्त फीचर्सच्या शर्यतीपासून दूर राहून Suzuki ने बनवली स्मार्ट बाईक! जाणून घ्या खासियत

Maruti Brezza 2026: Marutiच्या ‘या’ SUVवर ग्राहक फिदा! ९५ हजार बुकिंगचा टप्पा पार, कंपनीकडे ‘इतक्या’ लाखांहून अधिक ऑर्डर्स
4

Maruti Brezza 2026: Marutiच्या ‘या’ SUVवर ग्राहक फिदा! ९५ हजार बुकिंगचा टप्पा पार, कंपनीकडे ‘इतक्या’ लाखांहून अधिक ऑर्डर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.