
फोटो सौजन्य: @carandbike/ X.com
नुकतेच Maruti Suzuki ने देखील त्यांची पहिलीवहिली इलेक्ट्रिक कार Maruti E Vitara सादर केली. ही ईव्ही जानेवारी 2026 मध्ये भारतीय बाजारात लाँच केली जाईल. ही इलेक्ट्रिक कार युरोपमधील सुमारे 12 देशांमध्ये उपलब्ध आहे. परंतु याआधी, मारुतीची ही इलेक्ट्रिक कार भारत एनसीएपीच्या सेफ्टी टेस्टमध्ये पास झाली आहे, ज्यामध्ये ई-विटाराने 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवले. यापूर्वी, मारुती ई-विटाराला Euro NCAP कडून 4-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली होती.
5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवत मारुती ई-विटारा ही मारुतीच्या भारतीय क्रॅश-टेस्ट प्रोग्राममधील सर्वाधिक सुरक्षित कार म्हणून ओळखली जात आहे. ॲडल्ट ऑक्युपंट प्रोटेक्शन (AOP) मध्ये ई-विटाराला 32 पैकी 31.49 गुण मिळाले आहेत. 64 किमी/ताशी वेगाने करण्यात आलेल्या फ्रंटल ऑफसेट क्रॅश टेस्टमध्ये चालक आणि समोरील प्रवाशाच्या डोके व मानेसाठी ‘गुड’ रेटिंग, चालकाच्या छातीसाठी ‘साधारण’ (ॲव्हरेज) तर समोरील प्रवाशाच्या छातीसाठी ‘गुड’ रेटिंग नोंदवली गेली.
चाइल्ड ऑक्युपंट प्रोटेक्शन (COP) मध्ये ई-विटाराने 49 पैकी 43 गुण मिळवले आहेत. डायनॅमिक चाचणीत कारने 24 पैकी 24 गुण, तर चाइल्ड रेस्ट्रेंट सिस्टिम इंस्टॉलेशनमध्ये 12 पैकी 12 गुण मिळवले. उर्वरित 7 गुण व्हेईकल असेसमेंट कंपोनंटसाठी दिले गेले आहेत.
एंट्री वाघासारखी आणि विक्री शेळीसारखी! नोव्हेंबरमध्ये Elon Musk च्या Tesla च्या इतक्याच कार विकल्या
प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कंपनीने मारुती ई-विटारा काळजीपूर्वक डिझाइन केली आहे. स्टॅंडर्ड फीचर्समध्ये सात एअरबॅग्ज, ISOFIX चाइल्ड सीट अँकर पॉइंट्स आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल यांचा समावेश आहे. या मारुती एसयूव्हीमध्ये लेव्हल-2 ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS), 360-डिग्री कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि पुढील आणि मागील पार्किंग सेन्सर्स देखील आहेत.