नोव्हेंबरमध्ये Elon Musk च्या Tesla च्या इतक्याच कार विकल्या
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या महिन्यात Elon Musk च्या टेस्लाची विक्री धीम्या गतीने सुरु होती. चला जाणून घेऊयात, गेल्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरमध्ये कंपनीने देशभरात किती युनिट्स विकल्या?
11 वर्षात मुंबईकरांच्या वाहन संख्येत भलीमोठी वाढ! एकूण वाहनांची संख्या 53 लाखांच्या घरात
मीडिया रिपोर्ट्सनुसार, टेस्ला जगभरातील अनेक देशांमध्ये आपल्या कार ऑफर करते, परंतु गेल्या महिन्यात एलोन मस्कच्या टेस्लाची विक्री भारतात मंदावली. गेल्या महिन्यात देशभरात कंपनीने फक्त 48 कार्स विकल्या.
टेस्ला भारतात सातत्याने विस्तारत आहे. जुलैमध्ये मुंबईत पहिले शोरूम उघडल्यानंतर, उत्पादकाने दिल्लीतील एरोसिटीमध्ये दुसरे शोरूम उघडले. नोव्हेंबरच्या अखेरीस टेस्लाने गुरुग्राममध्ये ऑल-इन-वन सेंटर देखील उघडले.
कंपनीने सध्या भारतात फक्त एकच वाहन ऑफर करते. मॉडेल वाय हे भारतात विक्रीसाठी उपलब्ध असलेले एकमेव मॉडेल आहे.
अखेर प्रतीक्षा संपली! Maruti Suzuki E Vitara झाली लाँच, किमतीपासून रेंजपर्यंत तपशील एका क्लिकवर
टेस्लाची इलेक्ट्रिक एसयूव्ही Model Y मध्ये अनेक प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत. या कारमध्ये 15.4 इंच टचस्क्रीन, हीटेड आणि वेंटिलेटेड सीट्स, ॲम्बिएंट लाइटिंग, रियर-व्हील ड्राइव्ह, नऊ स्पीकर्स, AEB, ब्लाइंड स्पॉट कॉलिजन वॉर्निंग, आणि टिंटेड ग्लास रूफ यासारखे उत्तम फीचर्स पाहायला मिळतात.
Tesla Model Y ही कार कमी रेंज आणि लाँग रेंज अशा दोन बॅटरी पर्यायांसह उपलब्ध आहे. एका फुल चार्जनंतर ही कार अंदाजे 500 किमी आणि 622 किमी पर्यंत धावू शकते.
टेस्ला Model Y ची एक्स-शोरूम किंमत 59.89 लाख रुपये आहे. तर याच्या टॉप मॉडेल म्हणून दिल्या जाणाऱ्या लाँग रेंज व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 67.89 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.






