फोटो सौजन्य: @stockaajorkal (X.com)
भारतीय बाजारात अनेक वर्षांपासून काही बेस्ट ऑटो कंपन्या ग्राहकांच्या मागणी आणि आवडीनुसार कार्स ऑफर करत आहे. तसेच बदलत्या काळानुसार त्यांच्या कारचे अपडेटेड व्हर्जन सुद्धा लाँच करत आहे. अशातच आता मारुतीने त्यांच्या लोकप्रिय Maruti Grand Vitara चे नवीन एडिशन लाँच केले आहे.
मारुती सुझुकी ही भारतातील एक आघाडीची कार उत्पादक कंपनी आहे, जिने विविध सेगमेंट कार्स ऑफर केल्या आहेत. कंपनीच्या अनेक कार लोकप्रिय आहेत. Maruti Grand Vitara ही त्यातीलच एक कार आहे, जिला मार्केटमध्ये दमदार मागणी मिळत आहे. आता या कारचा PHANTOM BLAQ Edition सादर झाला आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.
मारुती सुझुकीने भारतीय बाजारात ग्रँड विटारा एसयूव्हीची फॅन्टम ब्लॅक एडिशन सादर केली आहे. देशातील नेक्सा डीलरशिपला 10 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कंपनीने ही स्पेशल व्हर्जन सादर केले आहे. हा नवा एडिशन अल्फा प्लस व्हेरिएंटमध्ये ऑफर करण्यात आला आले आहे. ज्यामध्ये अनेक उत्तम फीचर्स देण्यात आली आहेत.
मारुती सुझुकी ग्रँड विटाराच्या फँटम ब्लॅक एडिशनमध्ये मॅट ब्लॅक कलर व्हेंटिलेटेड सीट्स, शॅम्पेन गोल्ड ॲक्सेंट्स, पॅनोरॅमिक सनरूफ, 22.86 सेमी इन्फोटेनमेंट सिस्टम, रिमोट ॲक्सेस, कनेक्टेड कार फीचर्स, सहा एअरबॅग्ज, ईएसपी, ईबीडी, एबीएस, हिल होल्ड अशा अनेक फीचर्सचा समावेश आहे.
कांपनीने या कारला 1.5 लिटर क्षमतेचे इंजिन दिले आहे. जे 116 बीएचपी पॉवर आणि 141 न्यूटन मीटर टॉर्क देते. त्यात हायब्रिड टेक्नॉलॉजी देखील देण्यात आले आहे. यासोबतच, त्यात सीव्हीटी ट्रान्समिशन देण्यात आले आहे.
मारुती सुजुकीचे मार्केटिंग आणि सेल्सचे एसईओ पार्थो बॅनर्जी म्हणाले की, NEXAच्या दशकपूर्तीनिमित्त ग्रँड विटारा फँटम ब्लॅक एडिशन हे ग्राहकांना विशेषतः तयार केलेल्या नाविन्यपूर्णतेद्वारे प्रेरित करण्याच्या आमच्या सातत्यपूर्ण वचनबद्धतेचे प्रतीक आहे.
ग्रँड विटारा मारुतीने मिड साइझ एसयूव्ही सेगमेंटमध्ये ऑफर केली आहे. या सेगमेंटमध्ये, ती थेट Hyundai Creta, Kia Seltos, Honda Elevate, Tata Harrier, Mahindra Scorpio, MG Hector सारख्या एसयूव्हीशी स्पर्धा करेल.