फोटो सौजन्य: iStock
जर तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल. मात्र, डिस्कॉऊंटचा प्रतीक्षेत असाल तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आपण अशा एका कारबद्दल जाणून घेऊयात ज्यावर तब्बल 80 हजारांची सूट मिळत आहे.
कोणतीही कार खरेदी करताना ग्राहक नेहमीच त्याची किंमत आणि मायेजवर जास्त लक्ष देत असतात. त्यातही जर त्या कारवर डिस्काउंट मिळत असेल, तर मग हमखास ग्राहक त्या कारकडे आकर्षित होत असतात. म्हणूनच तर अनेक ऑटो कंपन्या नेहमीच काही ना काही खास डिस्काउंट देत असतात. अशातच, मार्केटमध्ये Nissan कंपनी एक दमदार डिस्कॉऊंट ऑफर करत आहे.
निसान इंडियाने अलीकडेच त्यांच्या सब-4-मीटर एसयूव्ही निसान मॅग्नाइटची ऑल ब्लॅक कुरो एडिशन लाँच केली आहे. या कुरो एडिशनची एक्स-शोरूम किंमत 8.31 लाख ते 10.87 लाख रुपयांपर्यंत आहे. आता कंपनी ऑगस्ट 2025 मध्ये त्यांच्या व्हेरिएंटनुसार डिस्काउंटच्या ऑफर घेऊन आली आहे. या ऑफरमध्ये कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट डिस्काउंट आणि विशेष फायनान्सिंग प्लॅन समाविष्ट आहे. कुरो एडिशनवर कोणतीही सवलत दिली जात नाही. निसान मॅग्नाइटवर उपलब्ध असलेल्या डिस्काउंटच्या ऑफरबद्दल जाणून घेऊया.
निसान मॅग्नाइटवर आकर्षक सवलतींची ऑफर जाहीर करण्यात आली आहे. ग्राहकांना कॅश डिस्काउंट आणि ॲक्सेसरीजवर 20,000 ची सवलत मिळणार आहे. डॅटसन किंवा निसान कार एक्सचेंज केल्यास 55,000 चा बोनस तर इतर ब्रँडच्या कारसाठी 35,000 चा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. याशिवाय, एन्ड ऑफ लाइफ एक्सचेंज बोनस 51,000 चा बोनस आणि कॉर्पोरेट ग्राहकांसाठी अतिरिक्त 5,000 ची सवलत उपलब्ध आहे. या सर्वांचा मिळून ग्राहकांना एकूण 80,000 रुपयांपर्यंतचा लाभ मिळू शकतो.
लक्षात घ्या, हे डिस्काउंट प्रत्येक शोरुमनुसार वेगळे देखील असू शकते. नेमकी ही ऑफर जाणून घेण्यासाठी जवळच्या निसान डीलरशिपशी संपर्क साधा . या सर्व ऑफर 31 ऑगस्ट 2025 पर्यंत वैध आहेत.
ही कार 1.0-लिटर NA पेट्रोल किंवा 1.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन पर्यायासह दिले जाते. त्याचे 1.0-लिटर एनए पेट्रोल इंजिन 71 बीएचपी पॉवर आणि 96 एनएम टॉर्क जनरेट करते. त्याचे 1.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन 99 बीएचपी पॉवर आणि 160 एनएम टॉर्क जनरेट करते.
या कारमध्ये 360-डिग्री कॅमेरा, वायरलेस फोन मिररिंग, ड्रायव्हरच्या सीटसाठी उंची समायोजन, पॉवर्ड मिरर, HEPA एअर फिल्टर, LED हेडलॅम्प आणि LED DRL सारखी फीचर्स आहेत.
प्रवाशांच्या सेफ्टीसाठी, यात VDC, ESC, TPMS, EBS सह ABS, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम, हिल स्टार्ट असिस्ट, हायड्रॉलिक ब्रेक असिस्ट, रेनफोर्ड बॉडी स्ट्रक्चर, डोअर प्रेशर सेन्सर आणि ग्रॅव्हिटेशनल सेन्सर, ड्रायव्हर सीट बेल्ट लॅप प्रीटेन्शनर, 6 एअर बॅग्ज, सर्व सीटसाठी सीट बेल्ट रिमाइंडर, ISO FIX चाइल्ड सीट अँकरेज, हाय स्पीड अलर्ट सिस्टम, ESS सारखी फीचर्स आहेत.