Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maruti मोठ्या धमाक्यासाठी सज्ज! स्मार्ट फीचर्स आणि हायब्रिड इंजिनसह लवकरच लाँच होणार नवीन कार, ग्राहकांची उत्सुकता शिगेला

Maruti सुझुकीची Baleno Facelift 2026 चे टेस्टिंग मॉडेल पहिल्यांदाच रस्त्यांवर दिसल्याने कारप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली असून, नव्या डिझाईनसोबत हायब्रीड इंजिन आणि ADAS फीचर्स मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 24, 2026 | 09:30 AM
Maruti मोठ्या धमाक्यासाठी सज्ज! स्मार्ट फीचर्स आणि हायब्रिड इंजिनसह लवकरच लाँच होणार नवीन कार, ग्राहकांची उत्सुकता शिगेला

Maruti मोठ्या धमाक्यासाठी सज्ज! स्मार्ट फीचर्स आणि हायब्रिड इंजिनसह लवकरच लाँच होणार नवीन कार, ग्राहकांची उत्सुकता शिगेला

Follow Us
Follow Us:
  • मारुती सुझुकी बलेनो फेसलिफ्ट 2026 चे टेस्टिंग मॉडेल पहिल्यांदाच दिसले असून, यावर्षी भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे.
  • नव्या बलेनोमध्ये रुंद ग्रिल, नवीन हेडलाइट्स, मोठी स्क्रीन, वेंटिलेटेड सीट्स आणि ADAS फीचर्स मिळू शकतात.
  • कंपनी या प्रीमियम हॅचबॅकमध्ये नवीन 1.2 लीटर हायब्रीड पेट्रोल इंजिन देण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मायलेज अधिक सुधारू शकते.
देशातील सर्वात मोठ्या कार निर्माता कंपन्यापैकी एक असलेली कार कंपनी Maruti Suzuki ने भारतात Baleno Facelift ची चाचणी सुरु केली आहे. अलीकडेच पहिल्यांदाच बलेनो फेसलिफ्ट 2026 चे टेस्टिंग मॉडेल पाहायला मिळाले आहे. याचे व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अशी शक्यता आहे की, कंपनी यावर्षी बलेनो फेसलिफ्ट 2026 भारतात लाँच करू शकते. त्यामुळे ग्राहकांची उत्सुकता आता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कंपनीच्या आगामी गाडीमध्ये कोणते फीचर्स मिळू शकतात, याबाबत आता जाणून घेऊया.

Auto Tips: पहिल्यांदाच खरेदी करताय Automatic Car? ड्रायव्हिंगदरम्यान या 4 चुका गियरबॉक्ससाठी ठरू शकतात घातक

कसे असणार बलेनो फेसलिफ्ट 2026 चे डिझाईन?

गाडीची संपूर्ण रचना आधीसारखीच असणार आहे, मात्र समोरील भागात एक अधिक रुंद ग्रिल, नवीन हेडलाइट्स आणि पुन्हा डिझाइन केलेला बंपर पाहायला मिळणार आहे. बाजूने पाहिले तर ही आगामी गाडी बलेनोसारखीच दिसते. या आगामी गाडीमध्ये केवळ एकाच बदलाची आशा केली जात आहे आणि हा बदल म्हणजे नवीन अलॉय व्हीलचा सेट. गाडीच्या मागील टेलगेटसुद्धा आधीसारखाच दिसत आहे. मात्र अशी शक्यता आहे की, यामध्ये नवीन टेललाइट्स पाहायला मिळू शकतात. (फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

काय असतील फीचर्स?

२०२६ मारुती सुझुकी बलेनोच्या इंंटीरियरबाबत अद्याप माहिती समोर आली नाही. मात्र अशी आशा आहे की, या गाडीचे इंंटीरियर देखील काही प्रमाणात आधीसारखेच असू शकते. असं सांगितलं जात आहे की, कंपनी यामध्ये नवीन इंटीरियर थीम आणि सीटसाठी नवीन मटेरियलचा वापर करू शकते. याशिवाय, बलेनो फेसलिफ्ट 2026 मध्ये मोठी स्क्रीन, वेंटिलेटेड सीट्स आणि आराम वाढवणारे नवीन फीचर्स दिले जाऊ शकतात. मारुती फ्रॉनक्स फेसलिफ्ट लेव्हल-2 ADAS युनिटसह चाचणी करताना पाहायला मिळाली आहे, त्यामुळे कंपनी बलेनो फेसलिफ्टमध्येही हेच ADAS वैशिष्ट्य देऊ शकते अशी अपेक्षा आहे.

अखेर तो क्षण आलाच! Honda City Facelift 2026 भारतीय बाजारात लाँच… वाचा किंमत आणि फीचर्स

इंजिन आणि पावरट्रेन

अशी शक्यता आहे की, मारुती सुझुकी बलेनो फेसलिफ्टचे इंजिन काही प्रमाणात आधीसारखेच असू शकते. तथापि, कंपनी या प्रीमियम हॅचबॅकमध्ये एक नवीन हायब्रीड इंजिन सादर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कंपनीद्वारे बलेनो फेसलिफ्टमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते, ज्याला बॅटरीने चालणाऱ्या इलेक्ट्रिक मोटारसोबत जोडले जाऊ शकत. या हायब्रिड इंजिनच्या मदतीने बलेनोची इंधन कार्यक्षमता आणखी सुधारू शकते.

Web Title: Maruti suzuki baleno facelift 2026 spotted testing in india hybrid engine and adas features expected

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • auto news
  • cars
  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

MG Hector च्या दोन नवीन एडिशन लाँच! ब्लॅकस्टॉर्म आणि स्नोस्टॉर्मची किंमत १९.९९ लाख रुपयांपासून सुरु
1

MG Hector च्या दोन नवीन एडिशन लाँच! ब्लॅकस्टॉर्म आणि स्नोस्टॉर्मची किंमत १९.९९ लाख रुपयांपासून सुरु

मिनी कूपर ऑक्सफर्ड एडिशनसाठी प्री-लाँच बुकिंग सुरू; Union Jack लूकसह मिळणार खास फीचर्स! जाणून घ्या डिटेल मध्ये
2

मिनी कूपर ऑक्सफर्ड एडिशनसाठी प्री-लाँच बुकिंग सुरू; Union Jack लूकसह मिळणार खास फीचर्स! जाणून घ्या डिटेल मध्ये

सुझुकी V-Strom SX ला नवा अवतार! ₹2.02 लाखांत मिळणार ड्युअल-टोन कलर
3

सुझुकी V-Strom SX ला नवा अवतार! ₹2.02 लाखांत मिळणार ड्युअल-टोन कलर

पेट्रोलही, इलेक्ट्रिकही आणि मेबॅकचा रॉयल थाटही! ₹3.35 कोटींची Mercedes-Maybach S 580e भारतात लाँच!
4

पेट्रोलही, इलेक्ट्रिकही आणि मेबॅकचा रॉयल थाटही! ₹3.35 कोटींची Mercedes-Maybach S 580e भारतात लाँच!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.