Auto News: पहिल्यांदाच खरेदी करताय Automatic Car? ड्रायव्हिंगदरम्यान या 4 चुका गियरबॉक्ससाठी ठरू शकतात घातक
अखेर तो क्षण आलाच! Honda City Facelift 2026 भारतीय बाजारात लाँच… वाचा किंमत आणि फीचर्स
ऑटोमॅटिक कार चालकांकडून केली जाणारी सर्वात सामान्य चूक म्हणजे गाडी चालू असताना गिअर बदलणं. गाडी पूर्णपणे थांबलेली नसेल तोपर्यंत गियर ड्राइव (D) हून रिवर्स (R) किंवा पार्क (P) मोडवर बदलू नका. ही चूक केल्यास गिअरबॉक्सच्या अंतर्गत भागांवर मोठा ताण येतो, ज्यामुळे गियरबॉक्स लगेच तुटू शकतात किंवा खराब होऊ शकतात. यामुळे गिअर बदलण्यापूर्वी गाडी पूर्णपणे थांबली असेल, याची खात्री करा. (फोटो सौजन्य – Pinterest)
असे अनेक लोकं असतात जे माइलेज वाचण्यासाठी उतारांवर किंवा फ्लाईओवरवरून खाली येताना गाडी न्यूट्रल मोडवर सेट करतात. मात्र ही सर्वात मोठी चूक आहे. ही पद्धत केवळ नुकसानदायकच नाही तर असुरक्षित देखील आहे. गाडी न्यूट्रल मोडवर सेट केल्यास तुमचा गाडीवरील कंट्रोल कमी होतो. तसेच गियरबॉक्सला मिळणारा ऑईल सप्लाय देखील थांबतो. ज्यामुळे गिअरबॉक्सचे भाग एकमेकांवर घासले जातात, ते जास्त गरम होतात आणि नुकसान होऊ शकते.
ट्रॅफिक सिग्नल किंवा जास्त वाहतूक कोंडी असलेल्या ठिकाणी जेव्हा गाडी थोड्या वेळासाठी थांबते, तेव्हा काही लोकं तात्काळ पार्क मोड ऑन करतात. नेहमी लक्षात ठेवा की, पार्क मोडचा वापर गाडी पूर्णपणे बंद करू एका ठिकाणी उभी करण्यासाठी केला जातो. ट्रॅफिक असलेल्या ठिकाणी जर तुम्ही वारंवार पार्क मोडचा वापर केला तर लॉकिंग पिनवर दबाव पडू शकतो. जर तुम्ही वाहतूक कोंडीत अडकला असाल, तर फक्त ब्रेक दाबून धरा किंवा गाडी N (न्यूट्रल) मध्ये टाका. वारंवार P मोड ऑन केल्यास गाडीचे नुकसान होऊ शकते.
Skoda Epiq ची ग्लोबल एंट्री! मिळणार दमदार रेंज, ADAS आणि प्रीमियम फीचर्स… जाणून घ्या किंमत
जेव्हा तुम्ही गाडी पार्क करता तेव्हा थेट P मोड चालू करून पाय हटवणं अत्यंत चुकीची सवय आहे. यामुळे गाडीचे संपूर्ण वजन गियरबॉक्सच्या एका छोट्या भागावर पडते. गाडी पार्क करताना सर्वात आधी गाडी थांबवा, गाडीला N मोडमध्ये शिफ्ट करा, आणि नंतर हँडब्रेक लावा. जेणेकरून गाडीचे संपूर्ण वजन ब्रेकवर येईल. त्यानंतरच P मोडमध्ये शिफ्ट करा.






