Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरे रे रे! सेफ्टी टेस्टमध्ये ‘या’ कारचा सुपडा साफ; फक्त मिळाली 2 स्टार रेटिंग, कंपनीला फुटलाय घाम

हल्ली अनेक कार त्यांच्या सेफ्टी टेस्ट करून घेत आहेत. अशाच एका मारुती सुझुकीच्या कारला सेफ्टी टेस्टमध्ये फक्त 2 स्टार मिळाले आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 19, 2025 | 06:47 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • Maruti Baleno चे सेफ्टी टेस्टमध्ये खराब प्रदर्शन
  • Latin NCAP क्रॅश टेस्टमध्ये मिळाली 2 स्टार सेफ्टी रेटिंग
  • कंपनीच्या टेन्शनमध्ये वाढ
पूर्वी कार खरेदी करताना ग्राहक कारच्या मायलेज आणि किमतीवर जास्त लक्ष द्यायचे. मात्र, आजचा ग्राहक कार खरेदी करताना कारमधील सेफ्टी फीचर्सकडे सुद्धा लक्ष देत असतो. ग्राहकांची हीच मागणी लक्षात घेत अनेक ऑटो कंपनी उत्तम सेफ्टी फीचर्स आणि टेक्नॉलॉजी असणाऱ्या कार ऑफर करतात. तसेच ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासाठी अनेक कंपन्या त्यांच्या कारचे सेफ्टी टेस्ट देखील करतात. मात्र, हेच सेफ्टी टेस्ट करणे Maruti Suzuki च्या अंगलट आले आहे. या टेस्टमध्ये कारची पोलखोल झाली आहे.

डिसेंबर 2025 मध्ये प्रसिद्ध झालेल्या लॅटिन NCAP क्रॅश टेस्टमध्ये भारतात बनवलेल्या Suzuki Baleno ला 2-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले. ही तीच Baleno आहे जी भारतात उत्पादित केली जाते आणि लॅटिन अमेरिकन बाजारपेठेत निर्यात केली जाते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की हे रेटिंग फक्त लॅटिन NCAP प्रदेशांमध्ये विकल्या जाणाऱ्या मॉडेल्सना लागू होत आहे.

Made In India Cars च्या मागणीत सुसाट वाढ, किती वाहनं केलीत निर्यात? जाणून घ्या

Latin NCAP मध्ये Baleno चा क्रॅश टेस्ट निकाल

Latin NCAP च्या सेफ्टी टेस्टमध्ये या कारला ॲडल्ट ऑक्यूपंट प्रोटेक्शनसाठी कारला 79% गुण मिळाले आहेत, तर चाइल्ड ऑक्यूपंट प्रोटेक्शनसाठी 65% स्कोअर नोंदवण्यात आला आहे. पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी Baleno ला 48% आणि सेफ्टी असिस्ट कॅटेगरीमध्ये 58% गुण देण्यात आले आहेत.

Latin NCAP द्वारे टेस्ट करण्यात आलेल्या Suzuki Baleno मध्ये 6 एअरबॅग्स देण्यात आले होते. टेस्टिंगदरम्यान कारचे बॉडीशेल स्थिर (Stable) असल्याचे स्पष्ट झाले असून, भविष्यातील अतिरिक्त लोड झेलण्यासही ते सक्षम असल्याचे नमूद करण्यात आले आहे. फ्रंटल आणि साइड इम्पॅक्ट टेस्टमध्ये प्रौढ प्रवाशांसाठी सुरक्षिततेला ‘गुड’ ते ‘एडिक्वेट’ अशी रेटिंग मिळाली आहे. तसेच रिअर इम्पॅक्ट चाचणीत व्हिपलॅश प्रोटेक्शनलाही ‘गुड’ रेटिंग देण्यात आली आहे.

Tata Sierra चा Base Variant खरेदी करण्यात तुमचा फायदा की तोटा? जाणून घ्या

बलेनोमध्ये ESC, सर्व जागांसाठी सीटबेल्ट रिमाइंडर्स आणि ISOFIX चाइल्ड सीट माउंट्स सारख्या आवश्यक सुरक्षा फीचर्ससह सुसज्ज होते. मात्र, लॅटिन NCAP रेटिंगमध्ये ADAS फीचर्सना खूप महत्त्व आहे. या मॉडेलमध्ये AEB (ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग), लेन असिस्ट, स्पीड असिस्ट आणि ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन सारख्या प्रगत सेफ्टी फीचर्सचा अभाव होता. या फीचर्सच्या अभावामुळे सेफ्टी असिस्टस्कोअर मर्यादित झाला, ज्यामुळे एकूण स्टार रेटिंग वाढू शकले नाही.

भारतात मात्र मिळाले 4 स्टार सेफ्टी रेटिंग

विशेष म्हणजे, भारत NCAP अंतर्गत भारतात टेस्टिंग केलेल्या मारुती सुझुकी बलेनोला 2-एअरबॅग आणि 6-एअरबॅग दोन्ही व्हेरिएंटसाठी 4-स्टार रेटिंग मिळाले. हे स्पष्टपणे दर्शवते की टेस्टिंग प्रोटोकॉल, स्कोअरिंग सिस्टम आणि सेफ्टी फीचर्स आवश्यकता देश आणि प्रदेशांमध्ये बदलतात. परिणामी, एकाच कारला वेगवेगळ्या एनसीएपी अंतर्गत वेगवेगळे स्टार रेटिंग मिळू शकतात.

लॅटिन एनसीएपीने असेही स्पष्ट केले की हे रेटिंग फक्त लॅटिन अमेरिकन बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या बलेनोला लागू होते. शिवाय, टेस्टिंग केलेली कार भारतात तयार केली गेली होती, हे दर्शवते की भारत मारुती सुझुकीसाठी एक महत्त्वाचा जागतिक उत्पादन केंद्र आहे.

Web Title: Maruti suzuki baleno got 2 star safety rating in latin ncap crash test

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2025 | 06:47 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

Tata Sierra चा Base Variant खरेदी करण्यात तुमचा फायदा की तोटा? जाणून घ्या
1

Tata Sierra चा Base Variant खरेदी करण्यात तुमचा फायदा की तोटा? जाणून घ्या

भारतातील ‘हे’ 5 स्कूटर म्हणजे दर्जा! वर्ष संपण्यागोदरच आणा घरी, किंमतही अगदी परवडणारी
2

भारतातील ‘हे’ 5 स्कूटर म्हणजे दर्जा! वर्ष संपण्यागोदरच आणा घरी, किंमतही अगदी परवडणारी

Made In India Cars च्या मागणीत सुसाट वाढ, किती वाहनं केलीत निर्यात? जाणून घ्या
3

Made In India Cars च्या मागणीत सुसाट वाढ, किती वाहनं केलीत निर्यात? जाणून घ्या

Citroen Basalt की Kia Sonet, किंमत, फीचर्स आणि इंजिनच्या बाबतीत कोणती SUV जास्त भारी?
4

Citroen Basalt की Kia Sonet, किंमत, फीचर्स आणि इंजिनच्या बाबतीत कोणती SUV जास्त भारी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.