फोटो सौजन्य: Gemini
Citroen Basalt की Kia Sonet, किंमत, फीचर्स आणि इंजिनच्या बाबतीत कोणती SUV जास्त भारी?
SIAM च्या आकडेवारीनुसार, FY2026 च्या पहिल्या आठ महिन्यात भारतातून सुमारे 5,99,276 पॅसेंजर व्हेईकल्स परदेशात निर्यात करण्यात आले आहेत. हा आकडा मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत सुमारे 20 टक्क्यांनी अधिक आहे. FY2025 मध्ये एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान 4,98,763 कार्सची निर्यात झाली होती. म्हणजेच यंदा जवळपास 1 लाख युनिट्सची थेट वाढ नोंदवली गेली आहे. यावरून भारतीय कार्सना जागतिक बाजारात मिळणारी पसंती स्पष्ट होते.
FY2026 मध्ये अजून चार महिने शिल्लक असून, सध्याचा वेग पाहता यंदा कार एक्सपोर्टचा आजवरचा सर्वात मोठा विक्रम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. FY2025 मध्ये एकूण 7,70,364 पॅसेंजर व्हेईकल्सची निर्यात झाली होती. विशेष म्हणजे, चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत तीन वेळा एका महिन्यात 80,000 पेक्षा जास्त कार्स परदेशात पाठवण्यात आल्या आहेत. सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे आकडे या मजबुतीची साक्ष देतात.
या यशासोबतच एक आव्हानही समोर आले आहे. मेक्सिकोने जाहीर केले आहे की 1 जानेवारी 2026 पासून भारतात तयार होणाऱ्या कार्सवर Import duties 20 टक्क्यांवरून 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात येणार आहेत. मेक्सिको हा भारतासाठी महत्त्वाचा एक्सपोर्ट मार्केट असून, FY2024 मध्ये भारताने तेथे सुमारे 1.94 लाख कार्स आणि SUV निर्यात केल्या होत्या, जो एकूण निर्यातीचा मोठा वाटा आहे.
मिनी कूपर घ्यायचा विचार करताय? भारतात सर्वांत स्वस्त कन्व्हर्टिबल ‘Mini Cooper S’ लाँच
मारुती सुझुकी दरवर्षी मेक्सिकोला मोठ्या प्रमाणात कार्स निर्यात करते. यामध्ये Baleno, Swift, Dzire आणि Brezza या मॉडेल्सचा समावेश आहे. याशिवाय, Hyundai कडून Grand i10, Aura, Venue आणि Creta या गाड्या पाठवल्या जातात. Volkswagen Group आणि Nissan India च्या कार्सही मेक्सिकोमध्ये लक्षणीय प्रमाणात विकल्या जातात.
मेड-इन-इंडिया कार्सची वाढती मागणी हे सिद्ध करते की भारत आता केवळ एक मोठा बाजार नसून, एक मजबूत मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणूनही उदयास आला आहे. टॅरिफसारख्या आव्हानांना योग्य पद्धतीने सामोरे गेल्यास, आगामी काळात भारत कार एक्सपोर्टच्या क्षेत्रात नवा इतिहास घडवू शकतो.






