
फोटो सौजन्य: Gemini
कंपनी नेक्सा डीलरशिपद्वारे अनेक कार ऑफर करते. या अहवालानुसार, डिसेंबरच्या महिन्यात कंपनी नेक्सा डीलरशिपवर ऑफर केलेल्या सर्व कारवर लाखो रुपयांचे डिस्काउंट देत आहे. चला जाणून घेऊयात, कोणत्या कारवर धमाकेदार डिस्काउंट मिळणार आहे.
मारुती इन्व्हिक्टो ही लक्झरी एमपीव्ही म्हणून ऑफर केली जाते. या महिन्यात ही एमपीव्ही खरेदी केल्यास जास्तीत जास्त 2.15 लाखांपर्यंत बचत होऊ शकते. एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत 24.97 लाखांपासून सुरू होते. याच्या टॉप-स्पेक व्हेरिएंटची किंमत 28.61 लाख (एक्स-शोरूम) आहे.
मारुतीच्या नेक्सा डीलरशिपवर उपलब्ध असलेली सर्वात किफायतशीर कार Ignis या महिन्यात 57,000 पर्यंतच्या ऑफर्ससह मिळू शकते. या कारची एक्स-शोरूम किंमत 5.35 लाख पासून सुरू होते आणि टॉप व्हेरिएंटची किंमत 7.42 लाख रुपये आहे.
मारुतीकडून मिड-साइज सेडान सेगमेंटमध्ये ऑफर करण्यात येणारी Ciaz काही काळापूर्वी बंद करण्यात आली आहे. मात्र, उरलेल्या युनिट्सवर कंपनीकडून जबरदस्त डिस्काउंट दिले जात आहे. या महिन्यात ही कार खरेदी केल्यास 1.30 लाख पर्यंतचा डिस्काउंट मिळू शकतो.
भारतीय बाजारात ऑफ-रोड SUV म्हणून ऑफर होणारी Jimny या महिन्यात खरेदी केल्यास जास्तीत जास्त 1 लाख पर्यंतची बचत मिळू शकते. याची एक्स-शोरूम किंमत 12.32 लाख ते 14.45 लाख रुपयांदरम्यान आहे.
Maruti E Vitara तुमच्यासाठी किती सुरक्षित? Bharat NCAP च्या सेफ्टी टेस्टमध्ये किती मिळाली रेटिंग?
कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमधील मारुतीची लोकप्रिय Fronx या महिन्यात खरेदी केल्यास 78,000 पर्यंतची बचत मिळण्याची संधी आहे. कंपनीकडून या SUV ची एक्स-शोरूम किंमत 6.85 लाखांपासून सुरू होते, तर टॉप व्हेरिएंटची किंमत 11.98 लाख रुपये आहे.
मारुतीकडून Baleno ही प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये ऑफर केली जाते. या कारवर या महिन्यात 60,000 पर्यंतचे ऑफर्स उपलब्ध आहेत. कंपनीने या कारची एक्स-शोरूम किंमत 5.99 लाख ते 9.10 लाखांदरम्यान निश्चित केली आहे.
मारुतीची XL6 ही लोकप्रिय MPV विक्रीसाठी उपलब्ध आहे. या कारची या महिन्यात खरेदी केल्यास जास्तीत जास्त 60,000 रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते. या कारची एक्स-शोरूम किंमत 11.52 लाख रुपयांपासून सुरू होते, तर टॉप व्हेरिएंटची किंमत 14.48 लाख रुपये आहे.