
फोटो सौजन्य: Pinterest
कॉम्पॅक्ट सेडान सेगमेंटमध्ये मारुती डिझायर ऑफर केली जाते. कंपनी ही सेडान CNG व्हेरिएंटमध्ये देखील ऑफर करते. जर तुम्ही ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर चला जाणून घेऊयात 1 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर दरमहा तुम्हाला या कारसाठी किती EMI द्यावा लागू शकतो.
नवीन वर्षात कार मालकांना अच्छे दिन? CNG चे भाव ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता
मारुती डिझायरच्या सीएनजी व्हेरिएंट म्हणून VXI ऑफर करते. कंपनी या कॉम्पॅक्ट सेडानचा बेस व्हेरिएंट 8.03 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत ऑफर करते. या एक्स-शोरूम किमतीसह तुम्हाला नोंदणी कर आणि आरटीओ शुल्क देखील भरावे लागणार. तसेच, ही कार खरेदी करण्यासाठी, आरटीओसाठी सुमारे 75 हजार रुपये आणि इंश्युरन्ससाठी सुमारे 30 हजार रुपये द्यावे लागतील. यानंतर, या कारची ऑन-रोड किंमत 9.09 लाख रुपये होईल.
जर तुम्ही Maruti Dzire चा VXI CNG व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर बँकेकडून या कारची एक्स-शोरूम किंमत आधार मानून कर्ज दिले जाते. अशा परिस्थितीत 1 लाख रुपये Down Payment केल्यानंतर उर्वरित 8.09 लाख रुपये तुम्हाला बँकेकडून घ्यावे लागतील.
बँकेकडून जर 9% व्याजदराने आणि 7 वर्षांच्या कालावधीसाठी 8.09 लाख रुपये कर्ज मंजूर करते, तर तुम्हाला पुढील 7 वर्षे दरमहा फक्त 13,153 रुपये EMI भरावा लागेल.
Nissan च्या पाठोपाठ 2026 मध्ये ‘या’ कंपनीच्या कार देखील महाग होण्याची शक्यता
जर तुम्ही 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी 8.09 लाख रुपये कार लोन घेतले, तर 7 वर्षे दरमहा 13,153 रुपये EMI भरावा लागेल. या कालावधीत तुम्ही केवळ व्याजापोटी सुमारे 2.95 लाख रुपये भराल.
यामुळे Maruti Dzire VXI CNG व्हेरिएंटची एकूण किंमत (एक्स-शोरूम, ऑन-रोड आणि व्याज मिळून) सुमारे 12.04 लाख रुपये इतकी होईल.