
फोटो सौजन्य: @PotfolioPensiev (X.com)
नुकतेच देशातील आघाडीची ऑटो कंपनी Maruti Suzuki ने EV सेगमेंटमध्ये आपले पहिले पाऊल ठेवत Maruti E Vitara लाँच केली आहे. चला या नवीन इलेक्ट्रिक कारच्या फीचर्स आणि अन्य गोष्टींबद्दल जाणून घेऊयात.
मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही, मारुती ई विटारा, भारतात अखेर लाँच करण्यात आली आहे. ही एसयूव्ही यापूर्वी जानेवारी 2025 मध्ये ऑटो एक्स्पोमध्ये सादर करण्यात आली होती.
अखेर प्रतीक्षा संपली! Maruti Suzuki E Vitara झाली लाँच, किमतीपासून रेंजपर्यंत तपशील एका क्लिकवर
कंपनीने या एसयूव्हीमध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स दिली आहेत. यामध्ये अँबियंट लाईट, 26.04 सेमी मिड, व्हेंटिलेटेड सीट्स, पॉवर-अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, स्लाइडिंग आणि रिक्लाइनिंग रीअर सीट, एलईडी लाईट्स, 18-इंच अलॉय व्हील्स, अँड्रॉइड ऑटो, अॅपल कारप्ले, ड्युअल-टोन इंटीरियर, व्हर्टिकल एसी व्हेंट्स, सनरूफ, वायरलेस चार्जर, 25.65 सेमी इन्फोटेनमेंट सिस्टम, रूफ स्पॉयलर, शार्क फिन अँटेना, ड्राइव्ह मोड्स, रेन आणि स्नो मोड्स यासारख्या फीचर्सचा समावेश आहे.
मारुतीने या एसयूव्हीमध्ये अनेक उत्कृष्ट सेफ्टी फीचर्स ऑफर केले आहेत. ही लेव्हल-2 एडीएएस सोबत सात एअरबॅग्ज, हिल होल्ड कंट्रोल, एबीएस, ईबीडी, सर्व चाकांवर डिस्क ब्रेक, ईएसपी, अॅक्टिव्ह कॉर्नरिंग कंट्रोल, सीट बेल्ट अॅडजस्टर, आयएसओफिक्स चाइल्ड अँकरेज, ब्रेक असिस्ट, 360-डिग्री कॅमेरा, पार्किंग सेन्सर्स, टीपीएमएस, ऑटो आयआरव्हीएम, ई-कॉल सारखे सेफ्टी फीचर्स प्रदान करते.
हिवाळ्यात EV कार्सचा रेंज अन् परफॉर्मन्स कायम ठेवायचा आहे? मग ‘या’ गोष्टी कधीच विसरू नका
इंडिया एनसीएपीने क्रॅश टेस्टिंगमध्ये या एसयूव्हीला सुरक्षिततेसाठी पूर्ण 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे.
मारुतीने ही एसयूव्ही 49किलोवॅट प्रति तास आणि 61किलोवॅट प्रति तास बॅटरी पर्यायांसह सादर केली आहे, ज्यामुळे ती एका चार्जवर 543 किमी ARAI मायलेज देते.
माहितीनुसार, या एसयूव्हीची डिलिव्हरी 2026 पासून सुरू होणार आहे. याआधी कंपनीने 1100 शहरांमध्ये तब्बल 2000 चार्जिंग पॉइंट्स उभारले आहेत. तसेच 2030 पर्यंत देशभरात एक लाख चार्जर्स बसवण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. याशिवाय, कंपनीने ही एसयूव्ही BaaS (Battery-as-a-Service) पर्यायासह उपलब्ध करून देण्याची माहिती दिली आहे.