हिवाळ्यात इलेक्ट्रिक कार्सची काळजी आवश्यक (फोटो- istockphoto)
हिवाळ्यात इलेक्ट्रिक कार्सच्या बॅटरीवर होऊ शकतो परिणाम
हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात ईव्ही करस्वर होतो परिणाम
थंडीच्या कालावधीत गाडीची काळजी घेणे आवश्यक
सध्या देशभरात अनेक ठिकाणी थंडीचा कडाका वाढला आहे. थंडीच्या काळात आपल्या गाड्यांची आपण काळजी कशी घ्यायची याबाबट आज आपण जाणून घेणार आहोत. थंडीचा परिणाम जास्त करून इलेक्ट्रिक वाहनांवर होताना दिसून येतो. ईव्ही गाडीच्या मालकांनी हिवाळ्यात सतर्क राहणे गरजेचे आहे. थंडीच्या दिवसांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा (Automobile)परफॉर्मन्स चांगला राहण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे ते जाणून घेऊयात.
खुल्या पार्किंगपासून बचाव करावा
थंडीच्या दिवसांमध्ये आपले इलेक्ट्रिक वाहन खुल्या पार्किंगमध्ये पार्क करणे टाळावे. खुल्यामध्ये गाडी पार्क केल्यास गाडीच्या बॅटरीवर परिणाम होण्याची शक्यता असते. रात्रीच्या वेळेस थंडीचा कडाका अधिक असते. जीमाऊले बॅटरीवर परिणाम होतो आणि रेंज कमी होते. अशा वेळेस गाडी एकसारखी चार्ज करावी लागते. ईव्ही गाडी नेहमी शेड खाली किंवा बंदिस्त पार्किंगमध्ये पार्क करावी जेणेकरून बॅटरीचे तापमान संतुलित राहण्यास मदत होते.
चार्जिंग मध्येच बंद करू नये
इलेक्ट्रिक वाहनांचे चार्जिंग मध्येच बंद करू नये. थंडीत गाडीच्या बॅटरीकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. बॅटरी चार्ज करत असताना मध्येच बंद केले आणि पुन्हा सुरू केल्यास बॅटरीचे आयुष्य आणि परफॉर्मन्स यावर परिणाम होतो.
एकसारखी गाडी धुवू नये
हिवाळ्यात इलेक्ट्रिक कार्सला एकसारखे धुणे धोक्याचे ठरू शकते. यामुळे गाडीच्या काही भागांना गंज लागण्याची शक्यता असते. पाण्याऐवजी वेट पाईपिंग देखील एक चांगला पर्याय उपलब्ध आहे.
नियमित तपासणी व सर्व्हिसिंग गरजेचे
थंडीच्या कालावधीत इलेक्ट्रिक कार्सचे नियमित चेकिंग करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास गाडीच्या बॅटरीवर परिणाम होण्याची शक्यता असते. बॅटरीची रेंज कमी होणे, चार्जिंग कमी होणे, न टिकणे अशा अडचणी येऊ शकतात. चांगला परफॉर्मन्स मिळवा यासाठी गाडीची नियमित तपासणी आवश्यक आहे.
थंडीत लाँच होणार ‘या’ गाड्या, वर्ष अखेरीस बाजारात तापणार वातावरण; स्पर्धा वाढून ग्राहकांना पडणार पेच
थंडीत लाँच होणार ‘या’ गाड्या
डिसेंबर महिना सुरू झाला आहे आणि देशभरात हिवाळा आला आहे. इतर महिन्याप्रमाणे या महिन्यातही काही वाहने बाजारात येणार आहेत. यामध्ये इलेक्ट्रिक कार (EV) आणि ICE कार (पेट्रोल/डिझेलवर चालणाऱ्या कार) यांचा समावेश असेल. यासोबतच काही वाहनांना फेसलिफ्ट्स देखील देण्यात आल्या आहेत, म्हणजेच नवीन, अपडेटेड मॉडेल्स. या वाहनांची बऱ्याच काळापासून वाट पाहत होते. आता, वर्षाच्या अखेरीस, ही वाहने अखेर बाजारात येणार आहेत. त्यांच्या आगमनामुळे बाजारात स्पर्धा वाढणार आहे. ही वाहने ग्राहक आणि कंपन्या दोघांसाठीही खूप महत्त्वाची असतील. चला तुम्हाला या कारबद्दल सांगूया.






