
फोटो सौजन्य: gemini
भारतीय ऑटो बाजारात अनेक कंपन्या आहेत. ज्यांच्या फक्त नावानेच अनेक वाहनांची विक्री होत असते. अशीच एक आघाडीची कंपनी म्हणजे Maruti Suzuki. कंपनीने देशात विविध सेगमेंटमध्ये दमदार कार ऑफर केल्या आहेत. तसेच वेळोवेळी कंपनीने त्यांच्या लोकप्रिय कारचे अपडेटेड व्हर्जन देखील बाजारात लाँच केले आहे. मात्र, माहितीनुसार कंपनीच्या Grand Vitara मध्ये बिघाड झाला आहे.
मारुती सुझुकीने भारतीय बाजारात विकल्या जाणाऱ्या ग्रँड विटारा मॉडेलसाठी मोठी रिकॉल जारी केला आहे. कंपनीच्या मते, 9 डिसेंबर 2024 ते 29 एप्रिल 2025 दरम्यान बनलेल्या अंदाजे 39,506 युनिट्स प्रभावित झाल्या आहेत. एसयूव्हीच्या फ्युएल लेव्हल इंडिकेटर आणि वॉर्निंग सिस्टममध्ये संभाव्य दोष असल्याने हा रिकॉल करण्यात आली आहे.
पाकिस्तानातील महागाईचा नवा उच्चांक! Swift ची किंमत 44 लाखांवर तर Toyota Fortuner ची किंमत कोटींमध्ये
कंपनीने नोंदवले आहे की मारुती सुझुकी ग्रँड विटाराच्या स्पीडोमीटरवरील फ्युएल गेज आणि वॉर्निंग लाइट प्रत्यक्ष फ्युएल लेव्हल अचूकपणे सांगू शकत नाही. याचा अर्थ असा की प्रत्यक्ष पातळी कमी असताना ड्रायव्हरला टाकीमध्ये इंधन आहे असे वाटू शकते. या परिस्थितीमुळे कार चालवण्यात अडचणी येण्याचा किंवा अचानक इंधन कमी होण्याचा धोका वाढू शकतो.
Maruti Suzuki प्रभावित वाहनमालकांशी थेट संपर्क साधणार आहे. ग्राहकांना आपले वाहन अधिकृत सर्व्हिस सेंटरवर घेऊन जाण्याचा सल्ला दिला जाईल, जिथे Faulty पार्टची तपासणी करून त्याची बदली केली जाईल. महत्त्वाचं म्हणजे, हा पार्ट रिप्लेसमेंट पूर्णपणे मोफत असेल. वाहनसुरक्षेच्या दृष्टीने कंपनीने हा निर्णय घेतला असून ग्राहकांनी डीलरशिपकडून येणाऱ्या कॉल किंवा मेसेजेसला त्वरित प्रतिसाद देण्याचं आवाहन केलं आहे, जेणेकरून त्यांच्या वाहनाची सुरक्षितता सुनिश्चित होऊ शकेल.
EVs चा भारतीय Auto Sector मध्ये दबदबा! ऑक्टोबर Electric Car च्या विक्रीत भरमसाट वाढ
Maruti Suzuki Grand Vitara ही भारतातील SUV आणि हायब्रिड सेगमेंटमधील एक लोकप्रिय मॉडेल आहे. याची किंमत 10.77 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप व्हेरिएंटची किंमत 19.72 लाख रुपयांपर्यंत जाते. ही पेट्रोल, CNG आणि PHEV अशा तिन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय, यात ऑल-व्हील ड्राइव्हचा पर्यायही दिला आहे, ज्यामुळे ती अनेक खरेदीदारांसाठी एक आकर्षक SUV ठरते.