फोटो सौजन्य: iStock
भारतीय ऑटो बाजारात नेहमीच विविध सेगमेंटमधील कार्सना चांगली मागणी पाहायला मिळते. यातही विशेष मागणी ही एसयूव्ही कार्सना मिळत असते. त्यामुळेच अनेक ऑटो कंपन्या मार्केटमध्ये अत्याधुनिक फीचर्ससह एसयूव्ही लाँच करत असतात. आता तर इलेक्ट्रिक एसयूव्ही देखील मार्केटमध्ये लाँच होत आहे. आता देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी दोन नवीन एसयूव्ही मार्केटमध्ये सादर करणार आहेत. यानिमित्ताने कंपनी इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये आपले पहिले पाऊल ठेवणार आहे.
भारतीय ऑटो बाजारात सर्वाधिक वाहने विकणारी मारुती सुझुकी लवकरच त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने या कारच्या लाँचिंगची वेळही जाहीर केली आहे. इतकेच नाही तर कंपनीने नेक्सा शोरूममध्ये ही कार डिस्प्ले करण्यासही सुरुवात केली आहे. यासोबतच, कंपनी 2025 मध्ये आणखी एक कार लाँच करण्याची योजना आखत आहे, जी एक एसयूव्ही असणार आहे. Maruti eVitara भारतात कधी लाँच होणार आहे? त्याबद्दल जाणून घेऊया.
BYD नंतर आता ‘या’ चिनी ऑटो कंपनीचा भारताच्या ऑटोमोबाईलवर लक्ष, Mahindra-Tata ला मिळणार टक्कर
मारुतीची ही पहिली इलेक्ट्रिक कार असणार आहे, जी सप्टेंबर 2025 मध्ये लाँच केली जाणार आहे. कंपनी या कारची नेक्सा आउटलेट्सद्वारे विक्री करणार आहे. यासोबतच, या आउटलेट्सवर eVitara देखील प्रदर्शित केली जात आहे. कंपनीने भारतातील ऑटो एक्स्पो 2025 मध्ये ती सादर केली होती. भारतात लाँच झाल्यानंतर, eVitara टाटा कर्व्ह EV, ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक आणि MG ZS EV शी स्पर्धा करेल. भारतात मारुती eVitara ची एक्स-शोरूम किंमत 16 लाख ते 17 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते.
eVitara व्यतिरिक्त, मारुती सुझुकी 2025 मध्ये आणखी एक SUV लाँच करणार आहे. दुसरी SUV कोणती असेल आणि ती कधी लाँच केली जाईल याबद्दल कंपनीने अद्याप माहिती दिलेली नाही, परंतु 2025 च्या अखेरीस ती भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही SUV ग्रँड विटाराचे ७-सीटर व्हर्जन असू शकते. ही कार भारतातील रस्त्यांवर टेस्टिंग दरम्यान अनेक वेळा दिसू शकते. या कारच्या पुढच्या आणि मागच्या डिझाइनमध्ये महत्वाचे बदल होऊ शकतात.
उद्या लाँच होणार Royal Enfield Hunter 350, मिळू शकते ‘ही’ मोठी अपडेट
मारुती सुझुकी देशांतर्गत मार्केटसह जागतिक ,मार्केटमध्येही आपली पकड मजबूत करण्याचा प्लॅन आखत आहे. 2025 च्या आर्थिक वर्षात कंपनीच्या देशांतर्गत विक्रीत फक्त 2% वाढ झाली होती, त्यामुळे आता कंपनी 2026 च्या आर्थिक वर्षात 20% निर्यात वाढीचे लक्ष्य ठेवत आहे. यासोबतच, 2025 मध्ये त्यांच्या व्यापक योजनांसह, कंपनी भारतीय ऑटो बाजारात 50% मार्केट शेअर पुन्हा मिळविण्यास सज्ज आहे.