
फोटो सौजन्य: Gemini
भारतात अनेक ऑटो कंपन्या आहेत. अशीच एक आघाडीची ऑटो कंपनी म्हणजे Maruti Suzuki. मारुतीने देशात अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. नुकतेच कंपनीने त्यांची पहिलीवहिली इलेक्ट्रिक कार Maruti e Vitara सादर केली आहे. जी जानेवारी 2026 मध्ये लाँच होणार आहे. या कारला देखील 5 स्टार सेफ्टी रेटींग मिळाली आहे. चला मारुती सुझुकीच्या अन्य सुरक्षित कारबद्दल जाणून घेऊयात.
Innova Crysta ला ‘ही’ Electric Car पाणी पाजणार! फीचर्स आणि सेफ्टीवर विशेष लक्ष
मारुती सुझुकीच्या नुकत्याच लाँच झालेल्या मिडसाइज एसयूव्ही व्हिक्टोरिसने भारत एनसीएपीच्या क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवली आहे. ॲडल्ट ऑक्युपंट प्रोटेक्शन (AOP) टेस्टिंगमध्ये या कारने 32 पैकी 31.66 गुण, तर चाइल्ड ऑक्युपंट प्रोटेक्शन (COP) टेस्टिंगमध्ये 49 पैकी 43 गुण मिळवून आपली सेफ्टी सिद्ध केली. ग्लोबल एनसीएपीमध्येही व्हिक्टोरिसने 5-स्टार सेफ्टी मिळवत प्रभावी कामगिरी केली आहे.
मारुती सुझुकीची लोकप्रिय कॉम्पॅक्ट सेडान डिझायरलाही भारत एनसीएपी आणि ग्लोबल एनसीएपी, या दोन्ही संस्थांकडून 5-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. भारत एनसीएपीच्या AOP टेस्टमध्ये डिझायरने 32 पैकी 29.46 गुण, तर COP टेस्टमध्ये 49 पैकी 41.57 गुण मिळवले आहेत. विक्रीच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या डिझायरने सुरक्षिततेतही आपली ताकद दाखवली आहे.
मारुती सुझुकीची प्रीमियम एमपीव्ही इन्व्हिक्टो सुद्धा भारत एनसीएपीच्या टेस्टिंगमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवण्यात यशस्वी ठरली आहे. ॲडल्ट ऑक्युपंट प्रोटेक्शनमध्ये 32 पैकी 30.43 गुण, तर चाइल्ड ऑक्युपंट प्रोटेक्शन श्रेणीत 49 पैकी 45 गुण मिळवत इन्व्हिक्टोने ग्राहकांचा विश्वास जिंकला आहे. लूक, फीचर्स, कम्फर्ट आणि सेफ्टी, या सर्व बाबतीत इन्व्हिक्टो अत्यंत सक्षम मानली जाते.
मारुतीची प्रीमियम हॅचबॅक बलेनो भारत एनसीएपीच्या क्रॅश टेस्टमध्ये 4-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवण्यात यशस्वी ठरली आहे. AOP टेस्टमध्ये तिने 32 पैकी 26.52 गुण, तर COP टेस्टमध्ये 49 पैकी 34.81 गुण मिळवले आहेत. एकूण परफॉर्मन्सच्या आधारे बलेनोला 4 स्टार सेफ्टी रेटिंग देण्यात आली आहे.