फोटो सौजन्य: @AutomobeIN/ X.com
TVS Ronnin चा एक नवीन व्हेरिएंट, Agonda लाँच केला आहे. या व्हेरिएंटमध्ये विशिष्ट स्टायलिंग आणि कॉस्मेटिक अपडेट्स आहेत. याची एक्स-शोरूम किंमत 1.31 लाख रुपये आहे. चला याच्या प्रमुख फीचर्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
या बाईकचे डिझाइन गोव्यातील शांत आणि सुंदर अगोंडा समुद्रकिनाऱ्यापासून प्रेरित आहे. या व्हेरिएंटमध्ये चमकदार पांढरी इंधन टाकी आणि हेडलॅम्प काऊल आहे, जे काळ्या रंगाच्या बॉडीसह एक आकर्षक कॉन्ट्रास्ट निर्माण करते.
या बाईकमध्ये अनेक कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत, ज्यामुळे ही पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक बनली आहे. याच्या इंधन टाकी आणि हेडलॅम्पवर चमकदार पांढरा रंग आहे. इंधन टाकीवर मोठ्या अक्षरात अगोंडा बॅज दिला गेला आहे. लाल आणि निळ्या रंगाच्या पिनस्ट्राइप्स देखील देण्यात आलाय आहेत.
बाईकमध्ये इंजिनसंबंधी कोणताही बदल केलेला नाही. यात पूर्वीप्रमाणेच 225.9cc, सिंगल-सिलेंडर, 4-स्ट्रोक, 4-वाल्व, SOHC इंजिन दिले आहे. हे इंजिन 20.4 PS पॉवर आणि 19.93 Nm टॉर्क निर्माण करते. यामध्ये 5-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. तसेच असिस्ट आणि स्लिपर क्लचची सुविधाही उपलब्ध आहे.
बाईकमध्ये डबल क्रॅडल स्प्लिट Synchro Stiff फ्रेम दिली आहे. पुढील बाजूस 41mm USD फ्रंट फोर्क आणि मागील बाजूस 7-स्टेप ॲडजस्टेबल मोनोशॉक सस्पेन्शन मिळते. यात 17-इंच फ्रंट आणि रिअर व्हील्स (टायर्स: 110/70 आणि 130/70) दिले आहेत. ब्रेकिंगसाठी 300mm फ्रंट आणि 240mm रिअर डिस्क ब्रेक्स देण्यात आले आहेत. यामध्ये ड्युअल-चॅनल ABS स्टँडर्ड स्वरूपात मिळते, तसेच रेन आणि अर्बन असे दोन ABS मोडही उपलब्ध आहेत.
फीचर्सच्या बाबतीत या बाईकमध्ये कोणताही बदल केलेला नाही. यामध्ये असिमेट्रिक लेफ्ट-माउंटेड राऊंड डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल दिलेला आहे. तसेच Glide Through Technology (GTT), ISG, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, व्हॉइस असिस्ट (कॉल, SMS, नेव्हिगेशन) आणि TVS SmartXonnect कनेक्टेड फीचर्स मिळतात. गिअर शिफ्ट इंडिकेटर, डिस्टन्स-टू-एम्प्टी, कॉल/SMS अलर्ट आणि साइड स्टँड इंडिकेटर यांसारखे फीचर्सही उपलब्ध आहेत.






