फोटो सौजन्य: iStock
भारतीय मार्केटमध्ये अनेक आघाडीच्या कार उत्पादक कंपन्या आहेत. मारुती सुझुकी ही त्यातीलच एक. कंपनीने नेहमीच ग्राहकांच्या मागणी आणि आवश्यकतेनुसार कार्स ऑफर केल्या आहेत. यातच आता वाढत्या EVs च्या मागणीत कंपनी लवकरच आपली पहिली वाहिली इलेक्ट्रिक कार देखील लाँच करणार आहे.
मारुती सुझुकीच्या विक्रीत देखील सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यातच आता कंपनीने मे 2025 मधील सेल्स रिपोर्ट जारी केला आहे. यात Maruti Suzuki Alto K10 ची जबरदस्त विक्री झाली आहे.
भारतीय मार्केटमध्ये अशा वाहनांचा शोध सुरू आहे जे परवडणाऱ्या आणि चांगले मायलेज देणाऱ्या असतात. अशावेळी, मारुती सुझुकीच्या कार्सना खूप पसंती दिली जाते. त्यामुळेच या कार्सची विक्रीही खूप जास्त आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच मे 2025 मध्ये कंपनीने देशांतर्गत आणि निर्यात अशा एकूण 1 लाख 80 हजार कार्सची विक्री झाली, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ दर्शवते.
लवकरच लाँच होणार Maruti ची बहुचर्चित इलेक्ट्रिक कार ! फीचर्स असे की कार खरेदी करण्यासाठी रांग लावाल
देशांतर्गत विक्रीबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या महिन्यात सुमारे 1.30 लाख ग्राहक सापडले, जे मे 2024 मध्ये विकल्या गेलेल्या 1.44 लाख युनिटच्या तुलनेत 5 टक्के घट दर्शवते. मारुती सुझुकीच्या कॉम्पॅक्ट हॅचबॅक आणि Alto K10, Celerio, Swift आणि Dzire सारख्या बहुतेक कार गेल्या महिन्यात 68 हजारांहून अधिक ग्राहकांनी खरेदी केल्या.
मारुतीने Alto K10 मध्ये अनेक आधुनिक फीचर्स समाविष्ट केले आहेत, जे याला पूर्वीपेक्षा अधिक स्मार्ट आणि सुरक्षित बनवतात. या कारमध्ये आता 6 एअरबॅग्ज स्टॅंडर्ड म्हणून मिळतात, जे या कारमध्ये एक मोठा बदल आहे. कारमध्ये 7 इंचाचा फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे, जो अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्लेला सपोर्ट करतो.
याशिवाय, यूएसबी, ब्लूटूथ आणि ऑक्स सारखे इनपुट पर्याय देखील उपलब्ध आहेत. यात एक नवीन मल्टीफंक्शनल स्टिअरिंग व्हील आहे, ज्यामध्ये माउंटेड कंट्रोल्स आहेत, ज्यामुळे ड्रायव्हिंग आणखी सोपे होते. हे सर्व फीचर्स पूर्वी S-Presso, Celerio आणि WagonR सारख्या कारमध्ये उपलब्ध होते, परंतु आता ते Alto K10 मध्ये देखील उपलब्ध आहेत.
500 KM ची रेंज, हायटेक फीचर्स आणि बरंच काही ! उद्या लाँच होणार Tata Harrier EV
मारुतीने अल्टो K10 मध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष दिले आहे. त्यात अनेक महत्त्वाची आणि प्रगत सेफ्टी फीचर्स आहेत. ABS म्हणजेच अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि ईबीडी म्हणजेच इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशन सारखे फीचर्स कारमध्ये उपलब्ध आहेत.
याशिवाय, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, प्री-टेन्शनर आणि फोर्स लिमिटर सीट बेल्ट, हाय-स्पीड अलर्ट सिस्टम आणि स्पीड सेन्सिंग ऑटो डोअर लॉक यासारख्या फीचर्सचाही त्यात समावेश करण्यात आला आहे.