Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maruti Suzuki India चा आगळावेगळा विक्रम, रेल्वेमार्फत तब्बल ३० लाखांहून अधिक वाहनांची वाहतूक

मारुती सुझुकीने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षात त्यांनी कार वाहतुकीसाठी रेल्वेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढवला असून हा टप्पा त्यांच्या "ग्रीन लॉजिस्टिक्स" या मोहिमेतील महत्वाचा टप्पा मानला जात आहे.

  • By विवेक गायकवाड
Updated On: May 13, 2026 | 06:34 PM
Maruti Suzuki,

Maruti Suzuki,

Follow Us
Close
Follow Us:

भारतासह जगभरात लोकप्रिय असलेल्या मारुती सुझुकीने (Maruti Suzuki India) आता भारतात एक अनोखा विक्रम प्रस्थापित केला आहे. भारतात वाहनाच्या विक्रीचे उच्चांक मोडणाऱ्या मारुती सुझुकीने यावेळी आगळावेगळा विक्रम बनवला आहे. साधारणपणे रस्तेमार्गावरून वाहनांची वाहतूक करणाऱ्या या कंपनीने भारतात रेल्वेमार्फत तब्बल ३० लाखांहून अधिक वाहनांची वाहतूक केली आहे. मारुती सुझुकीने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षात त्यांनी कार वाहतुकीसाठी रेल्वेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढवला असून हा टप्पा त्यांच्या “ग्रीन लॉजिस्टिक्स” या मोहिमेतील महत्वाचा टप्पा मानला जात आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ‘२०१४-१५ या आर्थिक वर्षात त्यांच्या एकूण वाहन वाहतुकीपैकी फक्त ५% वाहतूक हि रेल्वेमार्फत होत होती. मात्र, २०२५-२६ पर्यंत हा एकदा २६.५% पर्यंत वाढला आहे. विशेष म्हणजे अवघ्या २१ महिन्यांच्या कालावधीत २० लाखांवरून ३० लाख वाहनांच्या रेल्वे वाहतुकीचा टप्पा कंपनीने गाठला आहे.

यावेळी बोलताना मारुती सुझुकी इंडिया चे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO हिसाशी टाकेउची यांनी संगितले कि, “रेल्वे वाहतुकीमुळे कार्बन उत्सर्जन कमी होते. इंधनाची बचत होते. तसेच, रस्त्यांवरही ट्रॅफिकही कमी होतो. त्यामुळे पर्यावरणपूरक आणि अदाहक कार्यक्षम लॉजिस्टिकस प्रणाली उभारण्यावर कंपनीचा भर आहे,” असे ते म्हणाले. या उद्देशासाठी कंपनीने सुमारे ११,३७२ कोटींची गुंतवणूक ग्रीन लॉजिस्टिकस इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये केली आहे. यात गुजरातमधील हंसलपूर आणि हरियाणातील मानेसार येथील उत्पादन प्रकल्पांमध्ये रेल्वे सायडिंग, लॉजिस्टिकस हब, विशेष वाहतूक रेल्वे रेक्स आणि इतर पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत.

Tata Nexon चे नवे सरप्राइज! ‘Pure PS’ व्हेरिएंटचे दमदार लॉंच; १० लाखांत मिळणार लक्झरी फीचर्स

कंपनीचे पुढील लक्ष २०३०-३१ पर्यंत रेल्वेमार्फत होणाऱ्या वाहन वाहतुकीत ३५% पर्यंत वाढ करण्याचे आहे. यासाठी हरियाणातील खारखोडा येथे नवीन रेल्वे सायडिंग उभारण्याची योजना देखील कंपनीने जाहीर केली आहे. ही कामगिरी थेट कार विक्रीशी संबंधित नसली तरी भारतातील वाहन उद्योग अधिक आधुनिक, पर्यावरणपूरक आणि कमी खर्चिक वाहतूक व्यवस्थेकडे वळत असल्याचे यामुळे स्पष्ट होते. Maruti Suzuki India सध्या भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असून ती देशभरात लाखो वाहने विकते.

Maruti Suzuki India हि भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असून हि कंपनी सर्वसामान्यांना परवडणाऱ्या, चांगल्या मायलेज देणाऱ्या तसेच कमी मेंटेनन्स असणाऱ्या गाड्या उपलब्ध करून देते. मारुती सुझुकीची खासियत म्हणजे यांच्या कार्स या ‘मिडल क्लास फॅमिली कार्स’ म्हणून लोकप्रिय आहेत. मारुती सुझुकीच्या स्विफ्ट, बॅलेनो, वॅगन आर, अल्टो, ब्रेझ्झा, डिझायर आणि एर्टिगा या कार्स भारतीय बाजारात खूप लोकप्रिय असून त्यांना प्रचंड मागणी आहे. मारुती सुझुकीचे भारतात लोकप्रिय होण्याचे आणखी कारण म्हणजे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील असे दर, ग्रामीण भागातही उपलब्ध असे सर्व्हिस सेंटर्स तसेच कमी मायलेज हे आहेत. कंपनी आता हायब्रीड कार्स, सीएनजी गाड्या, इलेक्ट्रिक गाड्या तसेच ग्रीन लॉजिस्टिकस यावर जास्त लक्ष देत आहेत.

मार्केटमध्ये आग लागणार! Tata Altroz नवीन अवतारात बाजारात; पाहा किंमत अन् फीचर्स…

Web Title: Maruti suzuki uses railways to move 3 million vehichles

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 06:34 PM

Topics:  

  • Maruti Suzuki
  • Maruti suzuki Dzire
  • Maruti Suzuki Ertiga

संबंधित बातम्या

Petrol – CNG नाही तर आता ‘या’वर चालणार Swift कार, Suzuki चा नवीन आविष्कार, वाचा सविस्तर
1

Petrol – CNG नाही तर आता ‘या’वर चालणार Swift कार, Suzuki चा नवीन आविष्कार, वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.