फोटो सौजन्य: @waveringmindz/ X.com
भारतीय ऑटो बाजारात अनेक ऑटो कंपन्या आहे, ज्या दमदार कार ऑफर करत असतात. यातही सर्वात जास्त मागणी ही Maruti Suzuki च्या वाहनांना असते. गेल्या अनेक वर्षांपासून कार खरेदीदारांच्या मागणी आणि आवश्यकता समजून कंपनीने विविध सेगमेंटमध्ये दमदार कार्स ऑफर केल्या आहेत. नुकतेच कंपनीने त्यांची नवीन एसयूव्ही Victoris च्या किंमतीत वाढ केली आहे.
मारुती सुझुकीने भारतीय ऑटो बाजारपेठेत अनेक सेगमेंटमध्ये वाहने विकते. कंपंनीने अलीकडेच Maruti Victoris ही मिड साइझ एसयूव्ही लाँच केली. लाँच झाल्यानंतर काही काळातच, कंपनीने या एसयूव्हीची किंमत वाढवली आहे. मारुती व्हिक्टोरिसच्या कोणत्या व्हेरिएंटमध्ये किंमत वाढली आहे आणि किंमत वाढल्यानंतर ती किती किमतीला खरेदी करता येईल? त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.
मारुतीने त्यांच्या व्हिक्टोरिस एसयूव्हीची किंमत वाढवली आहे. रिपोर्टनुसार, ही किंमत 15000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही किंमत वाढ या एसयूव्हीच्या दोन व्हेरिएंट्सना लागू आहे.
रिपोर्ट्सनुसार, Maruti Victoris एसयूव्हीच्या ज्या दोन व्हेरिएंटची किंमत वाढली आहे ती म्हणजे ZXI+ (O) मॅन्युअल आणि ZXI+ (O) AT व्हेरिएंट. दोन्ही व्हेरिएंटची किंमत 15 हजार रुपयांनी वाढली आहे.
रिपोर्ट्सनुसार, बेस व्हेरिएंटपासून ते सर्व व्हेरिएंटच्या किमती अपरिवर्तित राहिल्या आहेत. बेस व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत अजूनही 10.50 लाखांपासून सुरू होईल, तर टॉप व्हेरिएंटची किंमत 19.99 लाख (एक्स-शोरूम) रुपये असेल.
मारुतीच्या व्हिक्टोरिस एसयूव्हीमध्ये अनेक आधुनिक आणि आकर्षक फीचर्स दिले आहेत. यात एलईडी हेडलाइट, एलईडी डीआरएल, कनेक्टेड रिअर टेल लाइट्स, शार्क फिन अँटीना, 26.03 सेमी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, अंडर बॉडी सीएनजी किट, डॉल्बी ॲटमॉस सिस्टीम, जेस्चर कंट्रोल टेलगेट, एंबियंट लाइट, अलेक्सा ऑटो व्हॉइस असिस्टंट, 35 पेक्षा जास्त कनेक्टेड फीचर्स, पॅनोरामिक सनरुफ, व्हेंटिलेटेड सीट्स यांसारखी फीचर्स दिली आहेत.
तुमच्या सुरक्षेत तडजोड करू नका! भारतातील ‘या’ सर्वात स्वस्त कारमध्ये 6 एअरबॅग्सचा ऑप्शन
निर्मात्यांच्या माहितीनुसार, ही एसयूव्ही भारत NCAP आणि ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळवली आहे. याशिवाय, यात 6 एअरबॅग, ABS, EBD, ISOFIX चाइल्ड अँकरज सारखे सेफ्टी फीचर्स दिले आहेत.
मारुतीच्या नवीन एसयूव्हीत 1.5 लिटर क्षमतेचे पॉवरफुल इंजिन दिले आहे. हे इंजिन प्रचंड पॉवर आणि टॉर्क देण्यास सक्षम आहे. यासोबत ही एसयूव्ही सहाअनियंत्रित (6-स्पीड) मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध आहे. तसेच, ही कार स्ट्रॉंग हायब्रिड टेक्नॉलॉजी आणि CNG पर्यायसह देखील लाँच केली गेले आहे.