फोटो सौजन्य: iStock
पूर्वी कार खरेदी करताना ग्राहक फक्त त्या कारच्या मायलेज आणि फीचर्सकडे लक्ष देत होते. मात्र, आजही स्थिती बदलली आहे. आजच्या ग्राहकाला त्याच्या कारमध्ये उत्तम सेफ्टी फीचर्स देखील हवे आहेत. म्हणूनच तर अनेक ऑटो कंपन्या त्यांच्या नवीन कारमध्ये स्टॅंडर्ड सेफ्टी फिचर म्हणून एअरबॅग्स समाविष्ट करत आहे. त्यात आता GST कमी झाल्यानंतर, भारतीय ऑटोमोबाईल बाजारपेठेतील अनेक बजेट कार आणखी परवडणाऱ्या झाल्या आहेत.
जर तुमचे बजेट 5 लाख रुपयांपर्यंत असेल आणि तुम्हाला मायलेज, फीचर्स आणि सुरक्षिततेच्या बाबतीत उत्कृष्ट कार हवी असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. चला भारतातील पाच सर्वात परवडणाऱ्या आणि सर्वोत्तम कारबद्दल जाणून घेऊयात.
Maruti Suzuki S-Presso ही भारतातील सर्वात परवडणारी आणि लोकप्रिय मायक्रो एसयूव्हींपैकी एक आहे. 2019 मध्ये लाँच झालेली ही कार आता अधिक अपडेटेड फीचर्ससह येते. जीएसटी कपातीनंतर, याची सुरुवातीची किंमत फक्त 3.49 लाखांपर्यंत कमी झाली आहे. यात 1.0-लिटर K10C पेट्रोल इंजिन आहे, जे 66 पीएस पॉवर आणि 89 एनएम टॉर्क निर्माण करते. त्याची सीएनजी आवृत्ती 33 किमी/किलो पर्यंत प्रभावी मायलेज देते. कारच्या इंटिरिअरमध्ये आतील भागात 7-इंच टचस्क्रीन, स्टीअरिंग कंट्रोल्स आणि मागील पार्किंग सेन्सर्स आहेत.
भारतातील सर्वात लोकप्रिय छोट्या कारपैकी एक, Alto K10, आता आणखी परवडणारी झाली आहे. याची सुरुवातीची किंमत 3.69 लाख रुपये आहे. नवीन जनरेशनमधील या कारमध्ये आता आधुनिक लूक आणि सुधारित इंधन कार्यक्षमता आहे. या कारचा सीएनजी प्रकार 33.85 किमी/किलो पर्यंत इंधन कार्यक्षमता देतो. यात पॉवर विंडो, डिजिटल क्लस्टर आणि उच्च प्रकारांमध्ये सहा एअरबॅग्ज देखील आहेत.
जर तुम्हाला SUV सारखा लूक असलेली कॉम्पॅक्ट कार हवी असेल, तर Renault Kwid हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. याची किंमत ₹4.29 लाखांपासून सुरू होते. SUV-इन्स्पायर्ड डिझाइन आणि 184 मिमी ग्राउंड क्लीयरन्स यामुळे ही कार विशेषतः तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. Kwid मध्ये 1.0-लीटर SCe इंजिन दिले असून, हे इंजिन सुमारे 22 kmpl पर्यंत मायलेज देते. या कारमध्ये 8-इंच टचस्क्रीन, रिअर कॅमेरा, आणि क्रूझ कंट्रोल सारखी आधुनिक फीचर्स उपलब्ध आहेत.
Tata Tiago ही बजेट सेगमेंटमधील सर्वात सुरक्षित आणि विश्वासार्ह कारांपैकी एक मानली जाते. GST कमी झाल्यानंतर या कारची सुरुवातीची किंमत आता 4.57 लाख रुपयांइतकी झाली आहे. यात 1.2-लीटर Revotron इंजिन (86 PS, 113 Nm) दिले असून, हे इंजिन पेट्रोल आणि CNG या दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या कारचे मायलेज 23 ते 26 km/l दरम्यान आहे. 7-इंच टचस्क्रीन, Harman Kardon साउंड सिस्टम, ESP, आणि 4-स्टार ग्लोबल NCAP रेटिंग यासारख्या फीचर्समुळे Tiago हे एक संपूर्ण आणि पॅकेज ठरते.
Maruti Celerio ही भारतातील सर्वात फ्युएल-एफिशियंट कारपैकी एक मानली जाते. याची सुरुवातीची किंमत 4.69 लाख आहे. 1.0-लिटर K10B इंजिन (67 पीएस, 89 एनएम) द्वारे समर्थित, ती एक स्मूथ ड्राईव्ह देते. याचा CNG व्हेरिएंट सुमारे 34 किमी/किलो मायलेज देतो, ज्यामुळे ती “मायलेज क्वीन” बनते.