फोटो सौजन्य: X.com
नवीन एमजी हेक्टर लाँच होण्यापूर्वी, सोशल मीडियावर एक नवीन टीझर रिलीज करण्यात आला आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.
राजकारणातील चाणक्य Sharad Pawar यांच्या Car Collection वर एकदा नजर फिरवाच
कंपनीने सोशल मीडियावर एक नवीन टीझर जारी केला आहे. नवीन टीझरमध्ये एसयूव्हीचा नवीन रंग दिसून आला आहे. माहितीनुसार, नवीन हेक्टर सेलेडॉन ब्लू रंगात लाँच केली जाऊ शकते. एसयूव्हीमध्ये इतर अनेक किरकोळ बदल देखील पाह्यला मिळू शकतात.
कंपनीने यापूर्वीही सोशल मीडियावर एक टीझर जारी केला होता, ज्यामध्ये एसयूव्हीच्या फ्रंट एंडची झलक दिसली होती. टीझरनुसार, एसयूव्हीच्या फ्रंट ग्रिलमध्ये सुधारणा करण्यात आली आहे आणि मागील टीझरमध्ये टेललाईट्सची झलक देखील दर्शविली गेली आहे. एसयूव्हीच्या नवीन व्हर्जनमध्ये नवीन आणि सुधारित इन्फोटेनमेंट सिस्टमसह अनेक नवीन फीचर्स देखील समाविष्ट असतील अशी अपेक्षा आहे.
काही काळापूर्वी ही एसयूव्ही टेस्टिंग करताना दिसली होती, ज्या दरम्यान तिच्या नवीन स्क्रीनबद्दल माहिती समोर आली होती. नवीन स्क्रीनमध्ये 10GB पर्यंत रॅम असण्याची अपेक्षा आहे. ही मोठी क्षमता सहज आणि जलद स्क्रीन प्रतिसाद आणि एकूण ऑपरेशन सुनिश्चित करेल.
Kia Seltos Vs Tata Sierra, कोणती SUV आहे एकदम बेस्ट? खरेदी करण्याअगोदर जाणून घ्या सर्वकाही
नवीन हेक्टरचे इंफोटेनमेंट सिस्टम मल्टी-टच जेस्चर कंट्रोल्सलाही सपोर्ट देऊ शकते. यामुळे ग्राहक केवळ जेस्चरच्या मदतीने फॅन स्पीड, म्युझिक प्लेबॅक यांसारख्या फंक्शन्स नियंत्रित करू शकणार आहे. हा फीचर केबिनमधील वापर आणखी सोपा करेल आणि ड्रायव्हिंगदरम्यानही सुविधा वाढविण्यात मदत करेल.
कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवी एमजी हेक्टर भारतात अधिकृतपणे 15 डिसेंबर रोजी लाँच करण्यात येणार आहे.
एमजी हेक्टरला बाजारात मिड-साइज एसयूव्ही म्हणून सादर केले जाते. या सेगमेंटमध्ये ही कार थाट Honda Elevate, Skoda Kushaq, Hyundai Creta, Mahindra Scorpio, Mahindra XUV700, आणि Kia Seltos सारख्या एसयूव्हींशी होते.






