फोटो सौजन्य: iStock
पूर्वी नवीन कार विकत घेताना कार खरेदीदार फक्त मायलेजचा विचार करत होते. परंतु आजचा कार खरेदीदार फक्त मायलेज नव्हे तर इत्तर महत्वाच्या गोष्टी सुद्धा बघत असतात. यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली सुरक्षितता. आज कित्येक ऑटो कंपनीज आपल्या आगामी कार्समध्ये उत्तम सेफ्टी फीचर्स आणत आहे.
मारुती सुझुकी ही एक अशी कंपनी आहे जी ग्राहकांच्या अपेक्षेनुसार कार्समध्ये बदल करत असते. सध्या कंपनी त्यांची मार्केटमध्ये लोकप्रिय असणारी मारुती डिझायरच्या नवीन व्हर्जनवर काम करत आहे. नुकतेच या आगामी नवीन मारुती डिझायरला क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार रेटिंग मिळाले आहे.
हे देखील वाचा: Nissan कार्सच्या विक्रीला उतरती कळा, कंपनीने एका झटक्यात 9000 लोकांना दिला नारळ
नवीन मारुती डिझायर ही क्रॅश टेस्टिंग उत्तीर्ण करणारी ब्रँडची पहिली कार ठरली आहे. तसेच मारुती डिझायरला ग्लोबल NCAP कडून 5-स्टार रेटिंग मिळाले आहे. ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टिंग उत्तीर्ण करणे भारतीय एनसीएपी टेस्टिंगपेक्षा खूप कठीण आहे. याआधी, मारुतीच्या कार्सना क्रॅश टेस्टिंगमध्ये 4-स्टारपर्यंत सुरक्षा रेटिंग मिळत होती. पण आता नवीन मारुती डिझायरने हे चित्र बदलले आहे.
मारुती डिझायरच्या नवीन जनरेशनच्या मॉडेलला अॅडल्ट ऑक्यूपेंट सेफ्टीमध्ये 5-स्टार मिळाले आहेत. तेच चाइल्ड ऑक्यूपेंट सेफ्टीमध्ये 4-स्टार मिळाले आहे. या कारला क्रॅश टेस्टिंगमध्ये मिळालेल्या स्कोअरबद्दल बोलायचे झाले तर न्यू डिझायरला ॲडल्ट ऑक्युपंट सेफ्टीमध्ये 34 पैकी 31.24 गुण मिळाले आहेत, जे या मारुतीसाठी उत्तम गुण आहेत. तर चाइल्ड ऑक्युपंट सेफ्टीमध्ये या कारने 42 पैकी 39.2 गुण मिळवले आहेत.
मारुती डिझायरला सेफ्टी रेटिंगमध्ये 5-स्टार मिळण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे कंपनीने या कारमधील वाढवलेली सुरक्षितता. या कारच्या स्टॅंडर्ड मॉडेलमध्ये ESC सेफ्टी फीचर्स समाविष्ट आहेत. या कारच्या क्रॅश टेस्टिंग दरम्यान, कारची रचना आणि फूटवेल एरियात स्थिर राहिले होते. या कारमधील सर्व सीटसाठी 3-पॉइंट सीट बेल्टचे सेफ्टी फीचर्स देखील प्रदान केले आहे. यासोबतच ही कार साइड इम्पॅक्ट टेस्टमध्ये पास झाली आहे.
हे देखील वाचा: Maruti Suzuki च्या अनेक कार्सवर आकर्षित सूट, जाणून घ्या कोणत्या कारवर किती डिस्काउंट
मारुती डिझायरच्या आधीच्या मॉडेलला क्रॅश टेस्टिंगमध्ये अॅडल्ट ऑक्यूपेंट सेफ्टी आणि चाइल्ड ऑक्यूपेंट सेफ्टी या दोन्हीमध्ये 2-2 स्टार मिळाले होते. जुन्या डिझायरमध्ये सुरक्षेसाठी समोरच्या बाजूला फक्त 2 एअरबॅग देण्यात आल्या होत्या. तर डिझायरच्या नव्या जनरेशनमध्ये सुरक्षेसाठी 6 एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत.
मारुती सुझुकीने नवीन डिझायर अधिक चांगल्या पद्धतीने तयार केली आहे. ही Maruti Dzire चे 5th जनरेशन मॉडेल येत्या 11 नोव्हेंबर रोजी भारतीय बाजारात लाँच होणार आहे. या कारमध्ये 1.2-लिटर, 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन असणार आहे.