फोटो सौजन्य: iStock
कित्येक काळापासून देशात अनेक ऑटो कंपनीज दमदार कार्स ऑफर करत असतात. त्यातही काही कंपनीज अशा आहेत ज्या ग्राहकांच्या अपेक्षेनुसार उत्तम कार्स मार्केटमध्ये आणत आहेत. भारतीय कार खरेदीदार नेहमीच बजेट फ्रेंडली कारच्या शोधात असतो, जे फक्त त्यांच्यासाठी नव्हे तर कुटुंबासाठी सोयीस्कर ठरेल. हीच अपेक्षा ओळखून मारुती सुझुकी अनेक वर्षांपासून उत्तम कार्स लाँच करत आहे.
मारुती सुझुकी गेल्या अनेक वर्षांपासून उत्तम कार्सची विक्री करत आहेत. जर तुम्हीही नोव्हेंबर 2024 मध्ये या कंपनीची कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Arena डीलरशिपवर ऑफर केलेल्या अनेक कारवर उत्कृष्ट डिस्काउंट ऑफर दिल्या जात आहेतचला जाणून घेऊया, मारुती कोणत्या कारवर किती सूट देत आहे.
हे देखील वाचा: Hyundai च्या ‘या’ कार्सवर मिळत आहे तब्बल 2 लाख रुपये बचत करण्याची संधी
नोव्हेंबर 2024 मध्ये Alto K10 वर मारुतीकडून 51 हजार रुपयांची कमाल ऑफर दिली जात आहे. कंपनी या महिन्यात या कारच्या CNG व्हर्जनवर 40 ते 45 हजार रुपयांच्या ऑफरही देत आहे. यामुळे ग्राहकांना चांगला फायदा होणार आहे.
नोव्हेंबर २०२४ मध्ये मारुतीच्या एस प्रेसो कारवर 55 हजार रुपयांच्या कमाल ऑफर दिल्या जात आहेत. नोव्हेंबर 2024 मध्ये ही ऑफर त्याच्या पेट्रोल व्हेरियंटवर उपलब्ध आहे. या महिन्याच्या CNG व्हर्जनवर 45 हजार रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते.
मारुती या महिन्यात Celerio वर 54 हजार रुपयांपर्यंतची कमाल ऑफर देत आहे. या हॅचबॅक कारवर 40 हजार रुपयांपासून ते 54 हजार रुपयांपर्यंतचे फायदे मिळतात.
कंपनीची Wagon R मार्केटमध्ये खूप लोकप्रिय आहे. या कारवर 49700 रुपयांची कमाल सूट मिळत आहे. ही ऑफर वॅगन आरच्या 1.2 लिटर पेट्रोल व्हर्जनवर दिली जात आहे. त्याच वेळी, एक लिटर इंजिनसह त्याच्या व्हेरियंटवर 45 हजार रुपयांचा फायदा मिळू शकतो. कंपनीच्या सर्वाधिक पसंतीच्या हॅचबॅक कारच्या CNG व्हर्जनवर 40 हजार रुपयांच्या डिस्काउंटचा लाभही मिळत आहे.
कंपनीच्या स्विफ्ट कारला तरुणांमध्ये खूप पसंती मिळत आहे. या कारची नवीन जनरेशन खरेदी केल्यास या महिन्यात 50 हजार रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते. मारुती स्विफ्टच्या वेगवेगळ्या व्हेरियंटवर डिस्काउंट ऑफर वेगळी असणार आहे. पण या महिन्यात स्विफ्टच्या CNG व्हर्जनवर 25 हजार रुपयांपर्यंतची बचत केली जाऊ शकते.
नोव्हेंबर 2024 मध्ये डिजायर कारवर मारुतीकडून 35000 रुपयांची ऑफर कंपनी देत आहे. ही बचत डिजायरच्या ऑटोमॅटिक व्हेरियंटवर केली जाऊ शकते, तर त्याच्या मॅन्युअल व्हेरियंटवर थोडी कमी ऑफर दिली जात आहे. तर मारुतीच्या ब्रेझावर 22 हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.