Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maruti Grand Vitara चा टप्यात कार्यक्रम! 28.65 Kmpl मायलेज देणाऱ्या ‘या’ SUV ने मार्केट खाल्लं

देशात मारुती सुझुकीने अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. मात्र, कंपनीच्या एका कारला त्यांच्याच कंपनीने मायलेजच्या बाबतीत हरवले आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 14, 2025 | 05:12 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • Maruti Suzuki Victoris ला भारतात चांगली मागणी
  • 28.65 Kmpl चा दमदार मायलेज
  • जाणून घ्या फीचर्स
भारतात मिड साइझ एसयूव्ही सेगमेंटला चांगली मागणी मिळताना दिसत आहे. अनेक कंपन्या या मागणीचे रूपांतर व्यवसायात करण्यासाठी मार्केटमध्ये दमदार एसयूव्ही ऑफर करत असतात. काही महिन्यांपूर्वी, मारुती सुझुकीने Victoris ही त्यांची नवीन एसयूव्ही लाँच केली होती. ही कार लाँच झाल्यानंतर ग्राहकांनी देखील या एसयूव्हीला आपलेसे केले.

मारुती सुझुकीची नवीन हायब्रिड एसयूव्ही, व्हिक्टोरिस, भारतीय बाजारपेठेत लोकप्रिय ठरत आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये, 12,300 हून अधिक ग्राहकांनी ही एसयूव्ही खरेदी केली, ज्यामुळे ती हायब्रिड विभागातील सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही बनली. उत्कृष्ट मायलेज, विश्वासार्ह तंत्रज्ञान आणि परवडणाऱ्या किमतीसह, व्हिक्टोरिसने Maruti Grand Vitara आणि Toyota Hyryder सारख्या लोकप्रिय एसयूव्हींना मागे टाकले आहे.

Mahindra XUV 7XO ची बुकिंग उद्यापासून सुरु, जाणून घ्या SUV मधील खास वैशिष्ट्य

परवडणारी हायब्रिड एसयूव्ही

मारुती सुझुकी व्हिक्टोरिसची एक्स-शोरूम किंमत 10.49 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप व्हेरिएंटसाठी 19.99 लाख रुपयांपर्यंत जाते. राजधानी दिल्लीमध्ये याच्या बेस मॉडेलची ऑन-रोड किंमत सुमारे 12 लाख रुपये आहे. या किमतीत हायब्रिड तंत्रज्ञानामुळे ती भारतातील सर्वात परवडणारी हायब्रिड एसयूव्ही बनते, ज्यामुळे ती मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी एक चांगला ऑप्शन आहे.

इंजिन आणि ड्रायव्हिंग अनुभव

व्हिक्टोरिसमध्ये 1.5 लिटर पेट्रोल इंजिन आहे ज्यामध्ये माईल्ड हायब्रिड टेक्नॉलॉजी आहे, जी 102 बीएचपी निर्माण करते. मजबूत हायब्रिड आणि सीएनजी पर्याय देखील उपलब्ध आहेत. ही एसयूव्ही मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह उपलब्ध आहे. ज्यामुळे शहरात आणि महामार्गावर ड्रायव्हिंगचा अनुभव सुरळीत आहे. एडब्ल्यूडी पर्यायामुळे ही एसयूव्ही माईल्ड ऑफ-रोड रस्त्यांवर देखील उत्तमप्रकारे चालू शकते.

3 लाखांचे डाउन पेमेंट आणि भारतातील सर्वाधिक लोकप्रिय EV तुमच्या दारात उभी, ‘असा’ असेल संपूर्ण हिशोब

दमदार मायलेज

Maruti Victoris ही आपल्या सेगमेंटमधील सर्वाधिक मायलेज देणारी एसयूव्ही मानली जाते. पेट्रोल व्हेरिएंटमध्ये ही कार सुमारे 21 किमी प्रति लिटर मायलेज देते. तर हायब्रिड व्हेरिएंटमध्ये कंपनीकडून तब्बल 28.65 किमी प्रति लिटर मायलेजचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय, CNG मॉडेलही अंदाजे 26 किमी प्रति किलो मायलेज देण्यास सक्षम असून, त्यामुळे ही कार अत्यंत किफायतशीर ठरते.

फीचर्स आणि सेफ्टीमुळे ऑलराउंडर एसयूव्ही

Victoris मध्ये मोठा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, पॅनोरॅमिक सनरूफ, वायरलेस चार्जिंग, 360 डिग्री कॅमेरा आणि कनेक्टेड कार टेक्नॉलॉजीसारखी अत्याधुनिक फीचर्स देण्यात आली आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने यात 6 एअरबॅग्स आणि लेव्हल-2 ADAS टेक्नॉलॉजीचा समावेश आहे. Bharat NCAP कडून मिळालेली 5-स्टार सेफ्टी रेटिंग ही कार कुटुंबासाठी अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह पर्याय बनवते.

Web Title: Maruti victoris give 2865 kmpl mileage than grand vitara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2025 | 05:12 PM

Topics:  

  • automobile
  • Maruti Suzuki
  • SUV

संबंधित बातम्या

परदेशात नवीन युनिट्स येईना अन् भारतात ग्राहकच मिळेना! Maruti Suzuki च्या ‘या’ कारची बातच न्यारी
1

परदेशात नवीन युनिट्स येईना अन् भारतात ग्राहकच मिळेना! Maruti Suzuki च्या ‘या’ कारची बातच न्यारी

भल्ले शाब्बास! ‘ही’ Made In India कार विदेशी पाहुण्यांनी घेती डोक्यावर! एक्स्पोर्टमध्ये तब्बल 260 टक्क्यांची वाढ
2

भल्ले शाब्बास! ‘ही’ Made In India कार विदेशी पाहुण्यांनी घेती डोक्यावर! एक्स्पोर्टमध्ये तब्बल 260 टक्क्यांची वाढ

भारताचा मास्टरस्ट्रोक! ‘या’ Trade Deal मुळे BMW आणि Mercedes सर्वसामान्यांना परवडणार
3

भारताचा मास्टरस्ट्रोक! ‘या’ Trade Deal मुळे BMW आणि Mercedes सर्वसामान्यांना परवडणार

2025 च्या वार्षिक विक्रीत 36 टक्क्यांची वाढ आणि आता 50000 वाहनांचे उत्पादन पूर्ण! ‘या’ कारचा सगळीकडे जलवा
4

2025 च्या वार्षिक विक्रीत 36 टक्क्यांची वाढ आणि आता 50000 वाहनांचे उत्पादन पूर्ण! ‘या’ कारचा सगळीकडे जलवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.