फोटो सौजन्य: Pinterest
ब्रिटिश ऑटो कंपनी MG मोटर्स भारतीय मार्केटमध्ये अनेक सेगमेंटमध्ये कार ऑफर करत असते. कंपनीने ऑफर केलेली MG Windsor Pro EV विक्रीसाठी उपलब्ध आहे. जर तुम्ही ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर 3 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर दरमहा किती ईएमआय भरावा लागेल त्याबद्दल जाणून घेऊयात.
Maruti Brezza Vs Nissan Magnite: कोणत्या कारमध्ये किती दम? जाणून घ्या फीचर्स, इंजिन आणि किंमत?
एमजी मोटर्स विंडसर प्रो ईव्हीचा बेस व्हेरिएंट 17.24 लाख या एक्स-शोरूम किमतीत देते. जर तुम्ही ही कार खरेदी केली तर याची ऑन-रोड किंमत अंदाजे 18.15 लाख रुपये आहे. या किमतीत अंदाजे 72000 रुपये विमा आणि अंदाजे 17000 टीसीएस शुल्क समाविष्ट आहे, ज्यामुळे ऑन-रोड किंमत 18.15 लाख रुपये होते.
जर तुम्ही या कारचा Pro व्हेरिएंट खरेदी करत असाल, तर बँकेकडून एक्स-शोरूम किमतीवरच कर्ज पुरवले जाईल. अशा परिस्थितीत 3 लाख रुपये डाउन पेमेंट भरल्यानंतर उर्वरित 15.15 लाख रुपये बँकेकडून कर्ज स्वरूपात घ्यावे लागतील. जर बँक तुम्हाला 9 टक्के व्याजदराने 7 वर्षांसाठी 15.15 लाख रुपयांचे लोन देते, तर पुढील 7 वर्षे दरमहा फक्त 24369 रुपयांचा EMI भरावा लागेल.
9 टक्के व्याजदराने 7 वर्षांसाठी 15.15 लाख रुपये कार लोन घेतल्यास, तुम्हाला दरमहा 24369 रुपयांचा EMI द्यावा लागेल. अशा प्रकारे 7 वर्षांत MG Windsor Pro EV साठी तुम्ही सुमारे 5.32 लाख रुपये व्याज भराल. यानंतर एक्स-शोरूम किंमत, ऑन-रोड खर्च आणि व्याज रक्कम मिळून या कारसाठी एकूण खर्च अंदाजे 23.46 लाख रुपये इतका होईल.






