फोटो सौजन्य: Gemini
नवीन नाव आणि अपडेट्ससह या नवीन एसयूव्हीची बुकिंग लाँच होण्यापूर्वीच उद्यापासून म्हणजेच 15 डिसेंबरपासून सुरू होईल. या एसयूव्हीची बुकिंग कशी करता येईल? एसयूव्हीची किंमत किती असू शकते? ती कोणत्या फीचर्ससह सुसज्ज आहे? ती कधी लाँच होईल? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊयात.
महिंद्रा सध्या मिड साइझ एसयूव्ही सेगमेंटमध्ये महिंद्रा एक्सयूव्ही 700 ऑफर करते. मात्र, कंपनी लवकरच ही एसयूव्ही अपडेट करेल आणि लाँच झाल्यानंतर तिचे नाव बदलून एक्सयूव्ही 7एक्सओ करेल. त्यापूर्वी, एसयूव्हीची बुकिंग उद्या अधिकृतपणे सुरू होईल.
3 लाखांचे डाउन पेमेंट आणि भारतातील सर्वाधिक लोकप्रिय EV तुमच्या दारात उभी, ‘असा’ असेल संपूर्ण हिशोब
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, महिंद्रा XUV 7XO चे बुकिंग 21 हजार रुपयांमध्ये करता येईल. या SUV चे बुकिंग 15 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजेपासून ऑनलाइन आणि डीलरशिपद्वारे करता येईल.
कंपनी या SUV मध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स देईल. यात प्रीमियम इंटिरिअर, पॅनोरॅमिक सनरूफ, ADAS, हरमन ऑडिओ सिस्टम, ट्रिपल स्क्रीन सेटअप, 360-डिग्री कॅमेरा, EBD सह ABS, 6 एअरबॅग्ज आणि ISOFIX चाइल्ड अँकरेज यांचा समावेश असेल.
कंपनी महिंद्राकडून XUV 7XO या एसयूव्हीमध्ये पेट्रोल आणि डिझेल असे दोन्ही इंजिन पर्याय देण्यात येण्याची शक्यता आहे. यामध्ये 2.0 लिटर टर्बो पेट्रोल आणि 2.2 लिटर टर्बो डिझेल इंजिन मिळू शकते. ट्रान्समिशनसाठी 6-स्पीड मॅन्युअल तसेच 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचे पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
महिंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही एसयूव्ही भारतात अधिकृतपणे 5 जानेवारी 2026 रोजी लाँच केली जाणार आहे.
महिंद्रा XUV 7XO ला मिड-साइज एसयूव्ही सेगमेंटमध्ये सादर केले जाईल. या सेगमेंटमध्ये तिची थेट स्पर्धा MG Hector, Tata Sierra, Tata Safari, Hyundai Creta, Honda Elevate, Kia Seltos आणि Hyundai Creta यांसारख्या लोकप्रिय एसयूव्हींशी होईल.






