फोटो सौैजन्य: @91wheels (X.com)
भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हीच वाढती लक्षात घेत अनेक ऑटो कंपन्या मार्केटमध्ये इलेक्ट्रिक कार, बाईक आणि स्कूटर ऑफर करत आहे. हल्ली मार्केटमध्ये अनेक दमदार इलेक्ट्रिक बाईक ऑफर आहे, ज्या लूक आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत भल्याभल्या बाईकला मागे टाकतील.
भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची मागणी सातत्याने वाढताना दिसत आहे.नुकतेच, इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी Matter ने भारतीय बाजारात Matter Aera ही एक नवीन बाईक म्हणून लाँच केली आहे. कंपनीने या बाईकमध्ये कोणत्या प्रकारचे फीचर्स दिली आहेत. या बाईकमधील बॅटरी आणि मोटर किती पॉवरफुल आहे? या बाईकची किंमत किती? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात.
60,000 रुपयांच्या डाउन पेमेंटवर Tata Punch खरेदी केली तर किती असेल EMI?
इलेक्ट्रिक बाईक सेगमेंटमध्ये, मॅटर एरा बाईक राजधानी दिल्लीमध्ये लाँच करण्यात आली आहे. ही बाईक कंपनीने अनेक उत्तम फीचर्स आणि मजबूत रेंजसह ऑफर केली आहे.
Matter Aera बाईकमध्ये 7 इंचाची स्मार्ट टचस्क्रीन आहे. त्यात नेव्हिगेशन, राईड डेटा, म्युझिक कंट्रोल सारखे फीचर्स आहेत. त्यात ओटीए अपडेट देखील देण्यात आले आहे. यासोबतच, ड्युअल डिस्क ब्रेक, एबीएस, ड्युअल सस्पेंशन सिस्टम, स्मार्ट पार्क असिस्ट सारखे फीचर्स देखील बाईकमध्ये देण्यात आले आहेत. याशिवाय, मॅटर ॲपद्वारे बाईकमध्ये कीलेस, रिमोट लॉक/अनलॉक, लाईव्ह लोकेशन, जिओ फेन्सिंग देखील देण्यात येत आहे.
भारतात लवकरच नवीन BMW 2 Series Gran Coupe होणार लाँच, काय असेल वैशिष्टय?
कंपनीने बाईकमध्ये एक पॉवरफुल बॅटरी आणि मोटर दिली आहे. जी लिक्विड कूल्ड तंत्रज्ञानासह दिली जात आहे. बाईकमध्ये आयपी 67 रेटेड बॅटरी आहे, जी एका चार्जमध्ये 172 किमी पर्यंतची रेंज देते. त्यात मोटर बसवल्याने, बाईकला 0-40 किमीचा वेग गाठण्यासाठी फक्त 2.8 सेकंद लागतात. बाईकमध्ये फोर-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. उत्पादकाच्या मते, बाईक प्रति किलोमीटर फक्त 25 पैसे या दराने चालवता येते.
दिल्लीतील Matter Aera बाईकची एक्स-शोरूम किंमत 1.94 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या बाईकची बुकिंग ऑनलाइन आणि शोरूममध्ये करता येणार आहे. कंपनी बाईकसोबत तीन वर्षे किंवा एक लाख किलोमीटरची वॉरंटी देत आहे.