फोेटो सौजन्य: @BBC_TopGear (X.com)
भारतीय बाजारात विविध सेगमेंटमध्ये कार्स ऑफर केल्या जातात. यातही बजेट फ्रेंडली कार्सना चांगली मागणी मिळत असली तरी देखील लक्झरी कार्सची चर्चा मोठ्या प्रमाणात होताना दिसते. भारतीय बाजारात अनेक लक्झरी कार उत्पादक कंपन्या आहेत. BMW ही त्यातीलच एक.
BMW ने देशात अनेक उत्तम कार्स ऑफर केल्या आहेत. अनेक सेलिब्रेटी आणि उद्योगपतींच्या ताफ्यात तर नक्कीच BMW च्या कार्स पाहायला मिळतात. अशातच कंपनी लवकरच भारतीय मार्केटमध्ये त्यांच्या लोकप्रिय 2 सिरीज ग्रॅन कूपचे एक नवीन मॉडेल लाँच करणार आहे. ही कार आधीच जागतिक बाजारात सादर केली गेली आहे. ही कार बीएमडब्ल्यूच्या 3 सिरीज सेडानपेक्षा कमी दर्जाचे मॉडेल आहे आणि यावेळी ही कार पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक डिझाइन, अपडेटेड इंटिरिअर आणि फीचर्ससह सादर केले जाईल. ही कार जुलै 2025 च्या अखेरीस लाँच केले जाऊ शकते. चला 2025 BMW 2 Series Gran Coupe बद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
ऑनलाईन कॅब बुक करणाऱ्यांनो लक्ष द्या ! ‘या’ वेळी Ola Uber दुप्पट भाडं आकारणार, सरकारने दिली परवानगी
2025 च्या बीएमडब्ल्यू 2 सिरीज ग्रॅन कूपला बाहेरून एक नवीन आणि स्पोर्टी लूक देण्यात आला आहे. त्याच्या समोर एक नवीन डिझाइन ग्रिल आहे, जी एलईडी हेडलॅम्पसह छान दिसते. त्याच्या बंपरला देखील पुन्हा आकार देण्यात आला आहे. तसेच साइड लूक पूर्वीसारखाच दिसतो. त्यात नवीन अलॉय व्हील्स देखील मिळतील. ग्लोबल मॉडेलमध्ये 17 ते 19 इंचांपर्यंतच्या व्हील्सचा पर्याय असेल. मागील बाजूस एलईडी टेल लाइट्स देण्यात आले आहेत.
नवीन 2 सिरीजचा इंटिरिअर खूपच प्रीमियम दिसतो. यात कर्व्ह डिस्प्ले सेटअप आहे, ज्यामध्ये 10.25-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि 10.7-इंचाचा इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. त्याचे केबिन पूर्णपणे काळ्या रंगाच्या थीममध्ये ठेवण्यात आले आहे, ज्यावर लाल रंगाचे ॲक्सेंट त्याच्या स्पोर्टी कॅरेक्टरला आणखी आकर्षक बनवतात.
Ferrari कडून सुसाट धावणारी सुपरकार सादर, फक्त 3.3 सेकंदात पकडते 0-100km चा वेग
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, या कारमध्ये मल्टीपल एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलीटी कंट्रोल, ABS, ब्रेक असिस्ट, कॉर्नरिंग ब्रेक कंट्रोल, पार्किंग सेन्सर आणि काही ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स फीचर्स (ADAS) सारखी फीचर्स देण्यात आली आहेत.
2025 बीएमडब्ल्यू 2 सिरीज ग्रॅन कूप याच्या ग्लोबल-स्पेक मॉडेलमध्ये हरमन कार्डन ऑडिओ सिस्टम, वायरलेस फोन चार्जर, ऑटो-डिमिंग आयआरव्हीएम आणि पॅनोरॅमिक ग्लास रूफ सारखी फीचर्स आहेत. यासोबतच, इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल आणि हीटेड फ्रंट सीट्स, मसाज फंक्शन ऑप्शन, मल्टी-कलर ॲम्बियंट लाइटिंग, ड्युअल-झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि वायरलेस ॲपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी देखील देण्यात आली आहे.