फोटो सौजन्य: @Aaronsmith333 (X.com)
देशात इलेक्ट्रिक कारला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच मागणीकडे लक्ष देत अनेक ऑटो कंपन्या मार्केटमध्ये दमदार इलेक्ट्रिक कार ऑफर करत आहे. मात्र, मार्केटमध्ये अशा अनेक कार आहेत, ज्यांची किंमत सर्वसामन्यांना परवडत नसते. म्हणूनच अनेक कंपन्या बजेट फ्रेंडली किमतीत Evs ऑफर करण्याचा प्रयत्न करत आहे.
बजेट फ्रेंडली EV म्हंटली की MG Comet EV नजरेसमोर येते. ही कार आता पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित आणि अधिक फीचर्सपूर्ण बनली आहे. 7 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीसह, ही इलेक्ट्रिक कार कमी बजेटमध्ये ईव्ही खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय आहे. तुमचा मासिक पगार ३० हजार रुपयांपर्यंत असला तरीही, तुम्ही एमजी कॉमेट ईव्ही EMI वर सहजपणे खरेदी करू शकता. या कारची ऑन-रोड किंमत, ईएमआय आणि फायनान्स प्लॅनबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.
भारतात येऊ शकतो Hyundai चा खास लक्झरी ब्रँड, कोणत्या कारची होऊ शकते एंट्री?
नवीन एमजी कॉमेट ईव्हीची ऑन-रोड किंमत सुमारे 7.30 लाख रुपयांपासून सुरू होते. जर तुम्ही 1 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केले तर तुम्हाला 6.30 लाख रुपयांचे लोन घ्यावे लागेल. या कर्जाचा व्याजदर दरवर्षी 9.8% इतका असेल आणि परतफेडीचा कालावधी ५ वर्षांचा असेल. यानुसार, तुम्हाला दरमहा 13,400 रुपये EMI भरावा लागेल. एकूण, 5 वर्षांत तुमचे एकूण पेमेंट सुमारे 8 लाख रुपये असेल, ज्यामध्ये लोनची मूळ रक्कम आणि व्याज दोन्ही समाविष्ट आहेत. लक्षात घ्या, या कारची ऑन रॉड किंमत प्रत्येक शहरानुसार बदलू देखील शकते.
एमजी कॉमेट ईव्ही फीचर्स आणि परफॉर्मन्सच्या बाबतीतही खूप चांगली आहे. ही एक कॉम्पॅक्ट 4-सीटर इलेक्ट्रिक कार आहे, जी विशेषतः शहरांमध्ये ड्रायव्हिंगसाठी डिझाइन केलेली आहे. यात 17.3 किलोवॅट प्रति तास लिथियम-आयन बॅटरी आहे, जी एकदा चार्ज केल्यावर 230 किमी पर्यंत चालते. ही कार एसी फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.
कमी किंमत… स्मार्ट फीचर्स! Tata Harrier आणि Safari अॅडव्हेंचर X व्हेरिएंट लाँच, काय आहे किंमत?
सुरक्षा आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत, ही कार ड्युअल एअरबॅग्ज आणि रियर पार्किंग कॅमेराने सुसज्ज आहे. यात पॉवर-फोल्डिंग ओआरव्हीएम, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि डिस्क ब्रेकसह ABS + EBD सारखी फीचर्स देखील आहेत, जी ती अधिक सुरक्षित बनवतात.