राजपाल यादव यांच्या ताफ्यात एकापेक्षा एक आलिशान कार
प्रसिद्ध बॉलीवूड विनोदी अभिनेता राजपाल यादव सध्या कठीण काळातून जात आहेत. सध्या ते 9 कोटी रुपयांच्या चेक बाउन्स प्रकरणात तिहार तुरुंगात आहेत. त्यांच्या जामिनाची सुनावणी सोमवारी होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा खटला न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र, त्यांच्या व्यावसायिक परिस्थिती काहीही असो, राजपाल यादव यांची जीवनशैली नेहमीच त्यांच्या चाहत्यांमध्ये चर्चेत राहिली आहे. यावेळी, त्यांचे कार कलेक्शन चर्चेचा विषय बनले आहे. एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, राजपाल यादव यांच्या कलेक्शनमध्ये कोणत्या कार पाहायला मिळतात. चला याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊयात.
अखेर राजपाल यादव यांची सुटका? फेडली एवढी रक्कम; अभिनेत्याच्या वकिलांनी दिला संपूर्ण हिशोब
राजपाल यादव यांच्याकडे महिंद्रा थार रॉक्स आहे. ही कार ऑफ-रोडींग करणाऱ्या चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत सुमारे 13 लाखांपासून सुरू होते आणि 23.4 लाखांपर्यंत जाते. थार रॉक्स डिझेल आणि डिझेल इंजिन दोन्ही पर्यायांसह उपलब्ध आहे. फीचर्समध्ये पॅनोरॅमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड सीट्स, 360-डिग्री कॅमेरा आणि मोठी टचस्क्रीन समाविष्ट आहे. ही एसयूव्ही तिच्या मजबूत लूक आणि पॉवरफुल कामगिरीसाठी ओळखली जाते.
राजपाल यादव यांच्याकडे महिंद्रा स्कॉर्पिओ असल्याच्या चर्चा आहेत. मात्र त्यांच्याकडे स्कॉर्पिओ क्लासिक आहे की नवीन स्कॉर्पिओ-N, याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. दोन्ही मॉडेल्स मजबूत बॉडी, दमदार रोड प्रेझेन्स आणि खराब रस्त्यांवरही उत्कृष्ट कामगिरीसाठी ओळखली जातात. स्कॉर्पिओ क्लासिकमध्ये डिझेल इंजिन आणि मॅन्युअल गिअरबॉक्स दिला जातो, तर स्कॉर्पिओ-N मध्ये पेट्रोल आणि डिझेल असे दोन्ही इंजिन पर्याय उपलब्ध आहेत.
अभिनेत्याच्या गॅरेजमध्ये टोयोटा इनोव्हा क्रिस्टाचाही समावेश असल्याचे सांगितले जाते. ही एमपीव्ही अनेक राजकारणी आणि चित्रपटसृष्टीतील कलाकारांची पसंतीची गाडी मानली जाते. आरामदायी आसनव्यवस्था, स्मूथ ड्रायव्हिंग अनुभव आणि लांब पल्ल्याच्या प्रवासात विश्वासार्ह कामगिरी ही तिची खास फीचर्स आहेत. यात 2.4 लिटर डिझेल इंजिन दिले जाते आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनेही ही कार मजबूत फीचर्ससह येते.






