फोटो सौजन्य: iStock
जर तुम्ही सुद्धा नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. हल्ली अनेक जण उत्तम कार आणि त्यापेक्षा पण दमदार डिस्काउंटच्या शोधात असतात. ऑटो कंपन्या देखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दमदार डिस्काउंट ऑफर करत असतात.
देशातील सर्वात स्वस्त ईव्ही तसेच भारतीय मार्केटमध्ये विविध सेगमेंटमध्ये कार ऑफर करणारी ब्रिटिश कंपनी एमजी मोटर्स जुलै 2025 मध्ये त्यांच्या कारवर दमदार डिस्काउंट देत आहे. या महिन्यात कोणत्या कारवर किती ऑफर दिली जात आहे? त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
MG Motors देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार म्हणून कॉमेट ईव्ही ऑफर करते. जुलै 2025 मध्ये ही कार खरेदी केल्यास जास्तीत जास्त 45000 रुपयांची बचत होऊ शकते. ही बचत त्याच्या Excite FC, Exclusive,आणि Exclusive FC व्हेरिएंटवर केली जात आहे. या महिन्यात त्याच्या एक्साईट व्हेरिएंटवर 35000 रुपयांपर्यंत बचत होऊ शकते.
या आठवड्यात लाँच होणार सर्वात स्वस्त Electric MPV? जाणून घ्या फीचर्स आणि अपेक्षित किंमत
एमजी द्वारे Astor ही मिड साइझ एसयूव्ही म्हणून विकली जाते. माहितीनुसार, जुलै 2025 मध्ये ही एसयूव्ही खरेदी केल्यास जास्तीत जास्त 95000 रुपयांची बचत केली जाऊ शकते. परंतु या महिन्यात, त्याच्या सर्व पेट्रोल मॅन्युअल व्हेरिएंटवर फक्त 85000 रुपयांची ऑफर दिली जात आहे.
एमजी सब फोर मीटर एसयूव्ही सेगमेंटमध्ये हेक्टर ऑफर करते. जर तुम्ही जुलै 2025 मध्ये ही एसयूव्ही खरेदी केली तर तुम्ही 3.05 लाख रुपये वाचवू शकता. ही बचत त्याच्या सहा-सीटर शार्प प्रो सीव्हीटी पेट व्हेरिएंटवर होईल. तुम्ही त्याच्या डिझेल व्हर्जनवर 1.80 लाख रुपयांपर्यंत बचत करू शकता.
एमजी इलेक्ट्रिक एसयूव्ही म्हणून ZS EV ऑफर करते. जर तुम्ही या महिन्यात ही एसयूव्ही खरेदी केली तर तुम्ही 1.29 लाख रुपयांपर्यंत बचत करू शकता. ही ऑफर त्याच्या एक्झिक्युटिव्ह व्हेरिएंटवर दिली जात आहे.
15 July 2025 भारतीय ऑटोमोबाईल इंडस्ट्रीसाठी असेल एकदम खास, नेमकं कारण काय?
एमजी ग्लोस्टर ही कंपनीची लोकप्रिय एसयूव्ही आहे. या महिन्यात ही एसयूव्ही खरेदी करून तुम्ही 3.50 लाख रुपयांपर्यंत बचत करू शकता.
जर तुम्ही या महिन्यात एमजी कार खरेदी करणार असालच तर सर्वात पाहिले तुमच्या जवळच्या शोरूमला भेट द्या आणि डिस्काउंट ऑफर्सची संपूर्ण माहिती मिळवा. लक्षात घ्या, शहर, शोरूम, व्हेरिएंटनुसार अनेक शहरांमध्ये या वेगवेगळे डिस्काउंट असू शकते.