Mahindra Racing Unveils New M13Electro Gen4 Formula E Car (फोटो सौजन्य-AI एआय)
महिंद्रा रेसिंगने 2027 Formula E चॅम्पियनशिपसाठी आपली नवीन इलेक्ट्रिक रेसिंग कार M13Electro Gen4 सादर केली आहे. 804 bhp पॉवर, 335 kmph टॉप स्पीड आणि अॅक्टिव्ह ऑल-व्हील ड्राइव्ह (AWD) यांसारख्या टेक्नोलॉजीमुळे ही कार चर्चेत आली आहे. Formula E स्पर्धेच्या चौथ्या जनरेशनमध्ये प्रवेश करताना इलेक्ट्रिक रेसिंगच्या दुनियेत मोठे बदल पाहायला मिळणार आहेत.
महिंद्रा रेसिंग ही Formula E मध्ये सहभागी असलेली एकमेव भारतीय ऑटोमोबाईल कंपनी आहे. कंपनीने स्पेनमधील माद्रिद येथे आपल्या नवीन कारचे सादरीकरण केले. Gen4 नियमांनुसार नवीन रेसिंग कारमध्ये 600 kW म्हणजेच 804 bhp पर्यंत पॉवर मिळणार आहे. ही कार 0 ते 100 kmph वेग अवघ्या 1.8 सेकंदांत गाठू शकते. तर तिचा टॉप स्पीड 335 kmph इतका आहे. अॅक्टिव्ह ऑल-व्हील ड्राइव्हमुळे कारच्या पुढील आणि मागील दोन्ही चाकांना पॉवर मिळेल.
महिंद्रा XUV 3XO ZNG ला Bharat NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग! पाहा सविस्तरपणे
M13Electro Gen4 चे टेक्निकल फीचर्स
या कारमधील रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीम 700 kW पर्यंत ऊर्जा पुन्हा मिळवू शकते. त्यामुळे ब्रेक लावताना निर्माण होणारी ऊर्जा बॅटरीमध्ये साठवण्यास मदत होईल. कारमध्ये हाय डाउनफोर्स आणि लो डाउनफोर्स असे 2 एरोडायनॅमिक सेटअप असतील. कॉर्नरिंगदरम्यान जास्त ग्रिप मिळवण्यासाठी हाय डाउनफोर्स सेटअप, तर सरळ ट्रॅकवर हवेचा विरोध कमी करण्यासाठी लो डाउनफोर्स सेटअप वापरता येईल.
पर्यावरणाचा विचार करून या कारची रचना करण्यात आली आहे. कारमधील 100 टक्के कंपोनंट्स पुन्हा वापरता येण्यासारखे आहेत. तसेच तिच्या निर्मितीमध्ये 20 टक्क्यांपेक्षा जास्त रिसायकल केलेल्या मटेरियलचा वापर करण्यात आला आहे. यामुळे इलेक्ट्रिक रेसिंगमध्ये परफॉर्मन्ससोबतच पर्यावरणपूरक प्रोडक्शनवरही भर दिला जात असल्याचे दिसते.
महिंद्रा व्हिजन S चा एक्स्टेरियर आणि इंटेरियर स्पाय फोटो आले समोर! 2027 मध्ये लाँच होण्याची शक्यता
Nyck de Vries आणि Edoardo Mortara सांभाळणार ड्रायव्हिंगची जबाबदारी
महिंद्रा रेसिंगकडून Nyck de Vries आणि Edoardo Mortara हे दोघेही नवीन M13Electro Gen4 कार चालवणार आहेत. सलग चौथ्या सीझनमध्ये ही जोडी एकत्र दिसणार आहे. नवीन कारच्या पॉवर डिलिव्हरी, ब्रेकिंग सिस्टीम आणि हँडलिंगचा अभ्यास करण्यात या दोन्ही ड्रायव्हर्सचा अनुभव उपयोगी ठरणार आहे.
महिंद्रा रेसिंगचे CEO आणि टीम प्रिन्सिपल Frederic Bertrand यांच्या मते, नवीन Gen4 कार समजून घेण्यासाठी इंजिनिअर्सना वेळ द्यावा लागणार आहे. 16 नोव्हेंबर 2026 पासून स्पेनमधील Circuito de Jarama येथे पहिल्या अधिकृत प्री-सीझन टेस्टिंगला सुरुवात झाली आहे. या टेस्टिंगमधून मिळणाऱ्या डेटाच्या आधारे टीम 2027 च्या Formula E सीझनसाठी कारमध्ये आवश्यक बदल करणार आहे.






