फोटो सौजन्य: @KIATurkiye (X.com)
भारतात इलेक्ट्रिक कारचे प्रोडक्शन मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे ग्राहकांचा Evs ला असणारा पाठिंबा. देशात अनेक ऑटो कंपन्या आहेत ज्या बेस्ट इलेक्ट्रिक कार ऑफर करत आहे. Kia Motors ने सुद्धा EV6 मार्केटमध्ये लाँच केली आहे.
अशातच जर तुम्ही लक्झरी इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण Kia EV6 चे नवीन फेसलिफ्ट व्हर्जन आता भारतात 10 लाख रुपयांपेक्षा जास्त सवलतीसह उपलब्ध आहे. नवीन EV6 केवळ पॉवरफुल नाही तर परफॉर्मन्स, सेफ्टी आणि जागेच्या बाबतीतही उत्तम आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
फेसलिफ्ट केलेल्या Kia EV6 ची किंमत भारतात 65.97 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे, परंतु अनेक डीलरशिप 10 लाख रुपयांपेक्षा जास्त फायदे देत आहेत. ही सवलत मर्यादित काळासाठी आहे, म्हणून जर तुम्ही EV खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही सर्वोत्तम वेळ असू शकते.
भारतातील ‘या’ शानदार कारला 20 वर्ष पूर्ण, मागणी एवढी की तब्बल 12 लाखांहून अधिक युनिट्सची झाली विक्री
फेसलिफ्टसह, EV6 ला आता मोठी आणि चांगली बॅटरी मिळते, ज्यामुळे याची रेंज वाढली आहे. भारतात, ही कार आता फक्त GT-Line AWD व्हेरिएंटमध्ये विकली जात आहे.
पॉवर स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर, त्यात आता ऑल-व्हील ड्राइव्ह (AWD) सिस्टम आणि जुन्या आवृत्तीचा रियर-व्हील ड्राइव्ह नसेल. आंतरराष्ट्रीय बाजारात याचे GT व्हर्जन देखील उपलब्ध आहे, जे पूर्णपणे परफॉर्मन्स ओरिएंटेड आहे.
Kia EV6 ला युरो NCAP कडून 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे, ज्यामुळे ती सर्वात सुरक्षित इलेक्ट्रिक कारपैकी एक बनली आहे. त्याच्या सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, त्यात ऑटो इमर्जन्सी ब्रेकिंग, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आणि लेन कीप असिस्ट फीचर्स आहेत.
Steelbird ने लाँच केला नवीन Vintage 3.0 हेल्मेट, रेट्रो लूकसह मिळणार उत्तम सुरक्षा
Kia EV6 मध्ये, तुम्हाला 520 लिटरची बूट स्पेस मिळते, जी लहान, मध्यम आणि मोठ्या सूटकेसमध्ये सहजपणे सामावून घेऊ शकते. याशिवाय, मागील सीटमध्ये 60:40 स्प्लिट फोल्डिंग आहे. गरज पडल्यास बूट स्पेस आणखी वाढवता येतो.
कियाने आता भारतात फक्त एकाच व्हेरिएंटमध्ये EV6 लाँच केले आहे. GT-Line AWD ची किंमत 65.97 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याचे RWD आणि GT व्हर्जन्स देखील आहेत.