
फोटो सौजन्य: Gemini
भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी काळानुसार वाढत आहे. वाहन उत्पादक कंपन्या एकामागून एक इलेक्ट्रिक कार लाँच करत आहेत. दुचाकी, तीन चाकी आणि चार चाकी वाहनांसह सर्व सेगमेंटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. तसेच सरकारकडून देशात ईव्ही पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यावरही भर दिला जात आहे.
फक्त 24 तासात ‘या’ दुचाकी उत्पादक कंपनीने मुंबईत तीन ठिकाणी उघडले शोरूम
ऑटो बाजारात अनेक इलेक्ट्रिक कार आधीच लाँच झाल्या आहेत. पण तुम्हाला भारतात विकली जाणारी सर्वात स्वस्त ईव्ही कोणती आणि त्याची किंमत किती? याबद्दल ठाऊक आहे का? चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
Eva ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. या कारमध्ये दोन प्रौढ आणि एक मूल बसू शकते. ईवा ही भारतीय बाजारात तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे: Nova, Stella आणि Vega. या इलेक्ट्रिक वाहनाची प्रति किलोमीटर किंमत 2 रुपये आहे.
ईवाची एक्स-शोरूम किंमत 3.25 लाखांपासून सुरू होते. भारतीय बाजारात यापेक्षा परवडणाऱ्या इतर कोणत्याही कार नाहीत. मिड-स्पेक स्टेला व्हेरिएंटची किंमत 3.99 लाख आहे, तर टॉप-स्पेक वेगा व्हेरिएंटची किंमत 4.49 लाख रुपये आहे.
Tata Sierra ची बुकिंग कधीपासून सुरु होणार? आणि डिलिव्हरीचं काय? जाणून घ्या एका क्लिकवर
ईवाच्या नोव्हा व्हेरिएंटमध्ये 9 किलोवॅट प्रति तास बॅटरी पॅक आहे, जी एका चार्जवर 125 किलोमीटरचा रेंज देण्याचा दावा करते. या ईव्हीचा मिड-स्पेक व्हेरिएंट असलेल्या स्टेला व्हेरिएंटमध्ये 12.6 किलोवॅट प्रति तास बॅटरी पॅक आहे. या बॅटरी पॅकसह, ईवा एका चार्जवर 175 किलोमीटर अंतर कापू शकते.
ईवाच्या टॉप व्हेरिएंटमध्ये 18 किलोवॅट प्रति तास बॅटरी पॅक आहे, जी कारला एका चार्जवर 250 किलोमीटर अंतर कापण्यास मदत करते. या इलेक्ट्रिक कारमध्ये ड्रायव्हर एअरबॅग आहे आणि ती CCS2 फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. ईवा लॅपटॉप चार्जिंग देखील देते.