फक्त 24 तासात 'या' दुचाकी उत्पादक कंपनीने मुंबईत तीन ठिकाणी उघडले शोरूम
ही तीन UV स्पेस स्टेशन्स हॉलमार्क मोबिलिटी LLP यांच्या भागीदारीत सुरु करण्यात आली आहेत. येथे ग्राहकांना X-47, F77 MACH 2 आणि F77 SuperStreet यांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. टेस्ट राईड, विक्री, सेवा, स्पेअर्स आणि अॅक्सेसरीज. या सर्व 3S सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध असतील.
उद्घाटनावेळी Ultraviolette चे CEO आणि सहसंस्थापक नारायण सुब्रमण्यम म्हणाले, “मुंबई हा आमच्या विस्तारातील महत्वपूर्ण टप्पा आहे. युनायटेड किंग्डममधील आमच्या अलीकडील लॉंचनंतर भारतीय बाजारात 100 ठिकाणांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही वेगाने काम करत आहोत. शाश्वत वाढ आणि जागतिक स्तरावरील दळणवळण बदलणे हे आमचे ध्येय आहे.”
हॉलमार्क मोबिलिटी LLP चे संचालक जिग्नेश मेहता यांनी सांगितले, “24 तासांत तीन UV स्पेस स्टेशन्स सुरू करणे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सुरक्षा, डिझाईन, नाविन्य आणि ग्राहक अनुभव—या सर्व क्षेत्रांत Ultraviolette नवे मानदंड स्थापित करत आहे.”
Ultraviolette च्या बाईक्समध्ये 40.2 hp पॉवरट्रेन, 100 Nm टॉर्क, केवळ 2.8 सेकंदात 0-60 kph स्प्रिंट, तसेच 10.3 kWh बॅटरीमुळे 323 किमी IDC रेंज अशी क्षमता आहे. 3-लेव्हल ट्रॅक्शन कंट्रोल, 10-लेव्हल रीजनरेटीव्ह ब्रेकिंग, Dynamic Stability Control (UV DSC) यांसारखी प्रगत फीचर्स सुरक्षितता वाढवतात.
9 महिन्यांच्या मुलांना गाडीवर बसवताय? मग ‘या’ राज्याने केलेला नियम वाचाच; नाहीतर…
X-47 मध्ये UV Radar Intelligence असून Blind Spot Detection, Lane Change Assist, Overtake Alert आणि Rear Collision Warning अशी Rider Assistance सिस्टमही उपलब्ध आहे. यामुळे Ultraviolette ही ARAS प्रणाली देणारी भारतातील पहिली इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक ठरते.
यापूर्वी कंपनीच्या ‘Tesseract’ इलेक्ट्रिक स्कूटर आणि ‘Shockwave’ मोटरसायकललाही देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.






