'या' कारच्या किमती पाकिस्तानात जास्त
आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तानात अंतिम सामना खेळण्यात आला. यात नेहमीप्रमाणे भारताने विजेतेपद आपल्या नावावर केले. यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तान चर्चेत आले आहे. पाकिस्तानच्या ऑटोमोबाईल मार्केटमध्ये भारतीय आणि जपानी कारला सर्वाधिक मागणी मिळत आहे. विशेषतः कॉम्पॅक्ट कार आणि सेमी-लक्झरी मॉडेल्स ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. या कार त्यांच्या परवडणाऱ्या किमती, उत्तम परफॉर्मन्स आणि उत्कृष्ट मायलेजमुळे लोकप्रिय आहेत. चला या कारच्या किमतीबद्दल जाणून घेऊयात.
सुझुकी अल्टो ही पाकिस्तानमधील सर्वात लोकप्रिय कार आहे. याचे कॉम्पॅक्ट डिझाइन आणि उत्कृष्ट मायलेज यामुळे ती ग्राहकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. पाकिस्तानमध्ये विकली जाणारी अल्टो मॉडेल भारतीय अल्टोपेक्षा डिझाइन आणि फीचर्समध्ये थोडी वेगळी आहे. याची किंमत पाकिस्तानात 29 लाख 94 हजार 861 पाकिस्तानी रुपये आहे.
दुसऱ्या क्रमांकावर सुझुकी स्विफ्ट आहे, जी भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांमधील ग्राहकांमध्ये दीर्घकाळापासून आवडती आहे. याचा स्टायलिश लूक, आरामदायी इंटिरिअर आणि उत्तम परफॉर्मन्स याची सर्वात मोठी ताकद आहे. पाकिस्तानमध्ये स्विफ्टला सतत मागणी असते. याची किंमत 44 लाख 60 हजार 160 पाकिस्तानी रुपये आहे.
पाकिस्तानमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेली सुजुकी बोलान व्यवसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. भारतात विकल्या जाणाऱ्या मारुती सुजुकी Omni सारखीच दिसणारी ही कार पाकिस्तानमध्ये अधिक मजबूत आणि विश्वासार्ह मानली जाते. याची किंमत 22 लाख पाकिस्तानी रुपयांपासून सुरू होते.
चौथ्या स्थानावर टोयोटा कोरोला असून, ती अनेक वर्षांपासून पाकिस्तानमधील सर्वात विश्वासार्ह सेडान म्हणून ओळखली जाते. मजबूत डिझाइन, आरामदायी राइड आणि कमी मेंटेनन्स खर्चामुळे ग्राहकांची ही पहिली पसंती ठरते. याची किंमत 61 लाख 19 हजार पाकिस्तानी रुपये आहे.
नवीन GST Rates मुळे ‘या’ दुचाकी उत्पादक कंपनीची लॉटरी निघाली! ग्राहकांची शोरूममध्ये प्रचंड झुंबड
पाचव्या क्रमांकावर होंडा सिटी असून, ती विशेषतः तरुण आणि ऑफिसला जाणाऱ्या व्यावसायिकांमध्ये लोकप्रिय आहे. स्टायलिश डिझाइन आणि प्रीमियम फीचर्समुळे ही गाडी खास ठरते. पाकिस्तानमध्ये याची किंमत 47 लाख 37 हजार पाकिस्तानी रुपये आहे.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की पाकिस्तानमधील कार खरेदीदार बहुतेकदा भारतीय आणि जपानी मॉडेल्सना जास्त प्राधान्य देतात. सुझुकी कार लहान मध्यम श्रेणीच्या बजेट खरेदीदारांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहेत, तर टोयोटा कोरोला आणि होंडा सिटी सारख्या कार लक्झरी आणि सेफ्टी फीचर्सच्या शोधात असलेल्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत.