फोटो सौजन्य: @SurrbhiM/X.com
भारत- पाकिस्तानची मॅच म्हंटलं की देशातील प्रत्येक व्यक्तीचे डोळे आपसूकच त्या मॅचकडे वळले जाते. नुकतेच आशिया कप 2025 चा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तानात खेळाला गेला. नेहमीप्रमाणे, भारताने पाकिस्तानला हरवत विजेतेपद आपल्या नावावर केलं. या सामन्यात तिलक वर्माची खेळी निर्णयक खेळी ठरली. यामुळेच तर त्याला प्लेअर ऑफ द मॅचचा खिताब मिळाला तर दुसरीकडे अभिषेक शर्माला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ चा खिताब मिळाला. त्याने या टूर्नामेंटमध्ये 314 धाव केल्या. तसेच अभिषेक शर्माला हवाल एच9 (Haval H9) कार देखील मिळाली. चला या कारच्या फीचर्स आणि किमतीबद्दल जाणून घेऊयात.
अभिषेक शर्मा यांना प्लेअर ऑफ द टूर्नामेंट म्हणून Haval H9 SUV कार गिफ्ट मिळाली आहे. ही 7 सीटर कार तिच्या शानदार लुक्स, लक्झरी फीचर्स आणि ऑफ-रोडिंग क्षमतेसाठी ओळखली जाते. भारतात ही कार अद्याप उपलब्ध नाही. मात्र काही रिपोर्ट्सनुसार या वर्षाच्या अखेरपर्यंत ती भारतात लाँच होण्याची शक्यता आहे.
Toyota Kirloskar Motor चा पर्यावरण आरोग्य दिनानिमित्त शाश्वततेच्या दिशेने भक्कम पाऊल
अभिषेक शर्मा यांना मिळालेली ही Haval H9 SUV, HAVALच्या सऊदी अरेबिया वेबसाइटनुसार भारतात जवळपास 33 लाख 60 हजार रुपये इतक्या किमतीत उपलब्ध होऊ शकते. ही कार चिनी ऑटोमोबाईल कंपनी GWM बनवते.
ही कार लक्झरी फीचर्सनी भरलेली आहे. आरामदायी सीट्स, 10 स्पीकर असलेलं साउंड सिस्टम, समोर 14.6 इंचाचं टचस्क्रीन, वायरलेस चार्जिंग सुविधा यामध्ये मिळते. ब्लाइंड स्पॉटसाठी सेन्सर्स, 360 डिग्री कॅमेरा यासारखी आधुनिक तंत्रज्ञानाची वैशिष्ट्यं असून ही कार ऑफ-रोडिंगसाठीही उपयुक्त आहे.
रायडर्स मंडळी हीच ती वेळ! 2025 Kawasaki KLX 230 आणि KLX 230 R S ची किंमत झाली कमी
अभिषेक शर्मा हा संपूर्ण टूर्नामेंटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. जरी फायनलमध्ये तो फक्त 5 धावा करून बाद झाला, तरी त्याने 2025 आशिया कपमधील 7 सामन्यांत एकूण 314 धावा केल्या. यात त्याच्या 3 अर्धशतकांचा समावेश आहे.