Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 6 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुख्यमंत्र्यांनी Mercedes G63 चालवत केलं मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचं उद्घाटन; जाणून घ्या SUV चे दमदार फीचर्स

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प पूर्ण झाल्याने प्रवाशांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या प्रकल्पामुळे आता प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 02, 2026 | 03:30 PM
मुख्यमंत्र्यांनी Mercedes G63 चालवत केलं मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचं उद्घाटन; जाणून घ्या SUV चे दमदार फीचर्स

मुख्यमंत्र्यांनी Mercedes G63 चालवत केलं मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचं उद्घाटन; जाणून घ्या SUV चे दमदार फीचर्स

Follow Us
Follow Us:
  • मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील 13.3 किमी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प पूर्ण होऊन 2 मेपासून सर्वसामान्यांसाठी खुला झाला आहे.
  • या प्रकल्पामुळे ट्रॅफिक जाम कमी होऊन प्रवासाचा वेळ आणि धोका दोन्ही कमी होणार आहेत.
  • उद्घाटनावेळी देवेंद्र फडणवीस यांनी Mercedes-AMG G63 चालवत प्रकल्पाची सुरुवात केली.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग हा भारतातील सर्वात व्यस्त आणि महत्वपूर्ण मार्गांपैकी एक आहे. हा मार्ग मुंबई आणि पुणे यांसारख्या मोठ्या शहरांना जोडतो. या मार्गावरील मिसिंग लिंक नावाचा एक भाग गेल्या बऱ्याच काळापासून समस्या बनला होता. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या लोकांना सहसा ट्रॅफिकचा सामना करावा लागत होता. या भागात नेहमी ट्रॅफिक समस्या असते, ज्यामुळे पावसाळ्यात या मार्गावरून प्रवास करणं अत्यंत धोकादायक बनलं होतं. मात्र आता चिंता करण्याची गरज नाही. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गवरील 13.3 किलोमीटरच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे काम आता अखेर संपले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे.

ना कार ना मोटरसायकल! ३ चाकांवर धावणारे अनोखे वाहन, 322 किमीची दमदार रेंज, काय आहेत या गाडीचे वैशिष्ट्ये?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले उद्घाटन

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या मिसिंग लिंकचे आता अधिकृतपणे उद्घाटन केले आहे. मिसिंग लिंक सुरु झाल्यामुळे आता दोन्ही शहरांमधील प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर मिसिंग लिंक 2 मेपासून सामान्य नागरिकांसाठी देखील सुरु करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – X) 

मिसिंग लिंकसंबंधित मुख्य गोष्टी

मिसिंग लिंक प्रकल्प अशा पद्धतीने डिझाईन करण्यात आला आहे की, नागरिक अशा भागांपासून स्वत:चा बचाव करू शकतील जिथे अधिक अपघात आणि ट्रॅफिक जाम असते. सुरु करण्यात आलेल्या नव्या मार्गात लांब बोगदे, उंच पूल आणि सरळ रस्ते तयार करण्यात आले आहेत. यामुळे प्रवासाला लागणारा वेळ कमी होईल आणि सुरक्षा आणखी वाढेल. धोकादायक वळणं आणि खराब हवामान यामुळे यामुळे होणारा उशीर आता मिसिंग लिंकमुळे संपणार आहे. मिसिंग लिंकचे उद्दिष्ट वाहनांचा वेग एकसमान ठेवणे आणि वाहतूक प्रवाह सुधारणे हे आहे.

महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने हुतात्म्यांना अभिवादन तसेच अभियांत्रिकी अविष्कारद्वारे ‘विकसित महाराष्ट्रा’च्या वाटचालीला चालना देणाऱ्या दिवसातील काही खास क्षण! Celebrating Maharashtra Day with pride, honouring our martyrs and capturing moments propelling ‘Viksit Maharashtra’… pic.twitter.com/pPLbJRCiUh — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 2, 2026

मुख्यमंत्र्यांनी चालवली मर्सिडीज एसयूव्ही

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकच्या उद्घाटनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जगातील सर्वात वेगवान एसयूव्हीपैकी एक असलेली Mercedes-AMG G63 चालवताना दिसले. ही लग्जरी कार त्याच्या जबरदस्त शक्ती आणि वेगासाठी ओळखली जाते, यामुळेच ही गाडी नव्या एक्सप्रेसवेसाठी योग्य पर्याय आहे.

Tata Sierra EV: ‘ती’ पुन्हा येतेय! आयकॉनिक SUV कधी होणार लाँच, किंमत वाचून व्हाल वेडेपिसे

इंजिन पावर आणि किंमत

या गाडीमध्ये 4.0 लीटरचे V8 बिटर्बो इंजिन आहे, जे 585hp पावर आणि 850nm चा टॉर्क निर्माण करते. यासोबतच यामध्ये 48V माइल्ड-हाइब्रिड सिस्टिम देखील देण्यात आले आहे, जे गाडीला 15kW ची एक्सट्रा इलेक्ट्रिक पावर ऑफर करते. मजबूत डिझाईन असून देखील ही एसयूव्ही केवळ 4.3 सेकंदात 0 ते 100 किमी प्रति तास वेग गाठते. तिचा सर्वोच्च वेग 240 किमी प्रति तास आहे. मर्सिडीज G63 AMG हे या मॉडेलचे टॉप व्हेरिएंट असून, त्याची एक्स-शोरूम किंमत 3.60 कोटी रुपये आहे.

Web Title: Mumbai pune expressway missing link opens travel to get faster as cm fadnavis inaugurates in mercedes g63

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 03:28 PM

Topics:  

  • CM Devendra Fadanvis
  • Mercedes
  • SUV

संबंधित बातम्या

‘भूसंपादन गतिमान करा, उद्योगांना वेळेत जमिनी द्या!’, मुख्यमंत्री फडणवीस यांचे ‘वर्षा’ निवासस्थानावरील आढावा बैठकीत निर्देश
1

‘भूसंपादन गतिमान करा, उद्योगांना वेळेत जमिनी द्या!’, मुख्यमंत्री फडणवीस यांचे ‘वर्षा’ निवासस्थानावरील आढावा बैठकीत निर्देश

Devendra Fadnavis: ‘काँग्रेस अत्यंत खालच्या स्तरावर..’; सुनेत्रा पवारांवरील ‘गुंगी गुडिया’ टीकेवर देवेंद्र फडणवीसांचा घणाघात
2

Devendra Fadnavis: ‘काँग्रेस अत्यंत खालच्या स्तरावर..’; सुनेत्रा पवारांवरील ‘गुंगी गुडिया’ टीकेवर देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी; सक्तीच्या धर्मांतरावर 7 ते 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद
3

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी; सक्तीच्या धर्मांतरावर 7 ते 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद

मुख्यमंत्र्यांच्या शहरात वर्ल्ड क्लास कन्वेंशन सेंटर; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आणखी एक अनोखी भेट
4

मुख्यमंत्र्यांच्या शहरात वर्ल्ड क्लास कन्वेंशन सेंटर; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आणखी एक अनोखी भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.