Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sports News: ‘खेलो इंडिया’मुळे खेळ पोहोचला गावागावात; ग्रामीण खेळाडूंना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संधी – मुख्यमंत्री फडणवीस

Devendra Fadnavis on Khelo India Sports : ‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून क्रीडा संस्कृती गावागावात पोहोचली असून, ग्रामीण भागातील खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी मिळत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 04, 2026 | 06:04 PM
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Follow Us
Follow Us:
  • ‘खेलो इंडिया’ने ग्रामीण खेळाडूंना दिले व्यासपीठ
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
  • ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेचा पुण्यात समारोप

पुणे : देशातील क्रीडा क्षेत्रात मोठे परिवर्तन होत असून, ‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून खेळ ग्रामीण भागातील गावागावात पोहोचला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंनाही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे आयोजित ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धा (मुख्यमंत्री चषक) समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार विक्रांत पाटील, आमदार शंकर जगताप, मनपा आयुक्त नवल किशोर राम, क्रीडा आयुक्त दीपक सांगला,बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव सुबिंदर सिंह गिल, महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष संदीप जोशी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

IND vs NZ: आधी किवींची दाणादाण उडवली; मग गर्लफ्रेंडसाठी भर मैदानात केली खास गोष्ट, Arshdeep Singhचं ‘त्या’ सेलिब्रेशनचा Video Viral

महाराष्ट्राच्या क्रीडा परिसंस्थेमध्ये बालेवाडी येथील क्रीडा संकुल महत्वाची भूमिका बजावत असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘खेलो इंडिया’ स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे खेळाडू सातत्याने चांगली कामगिरी करून पदके मिळवत आहेत. राज्य शासनाने ‘मिशन लक्ष्यवेध’च्या माध्यमातून विविध खेळांसाठी उत्कृष्ट प्रशिक्षण देणारी केंद्रे सुरू केली आहेत. बास्केटबॉल हा महाराष्ट्रातील लोकप्रिय खेळ असून, राज्याने देशाला अनेक दर्जेदार खेळाडू दिले आहेत. अशा राष्ट्रीय स्पर्धांमुळे खेळाडूंना अनुभव आणि राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळते. महाराष्ट्र बास्केटबॉल संघटनेने या स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन केल्याचा त्यांनी विशेष उल्लेख केला.

आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचा उल्लेख करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, यावेळी भारताने ४८ पदके मिळविली. विशेष म्हणजे १७ राज्यांतील खेळाडूंनी पदकांची कमाई केली. कबड्डी, नेमबाजी आणि तिरंदाजीसारख्या खेळांत सामान्य कुटुंबांतील खेळाडूंनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश मिळविले. खेळाडूंची परिस्थिती नव्हे, तर त्यांची जिद्द, मेहनत आणि खेळाप्रती असलेली निष्ठा महत्वाची असते.

सर्व विजेत्या आणि सहभागी संघांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. महाराष्ट्राचा संघ यंदा अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकला नसला, तरी त्यातून निराश होण्याचे कारण नाही. खेळात जय-पराजय होत असतो. पुढील स्पर्धेत अधिक चांगली कामगिरी करण्याची संधी खेळाडूंना मिळेल. खेळाडूंमध्ये जिद्द, महत्वाकांक्षा आणि खिलाडूवृत्ती असणे महत्वाचे असून, पराभवानंतरही न थांबता प्रयत्न करणारे खेळाडूच भविष्यात विजयाचे मानकरी ठरतात, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

या स्पर्धेत सहभागी झालेल्या विविध राज्यांतील संघांमधून भारताचे वैविध्य आणि एकात्मतेचे दर्शन घडते. दक्षिण आणि उत्तर भारतातील राज्यांचे खेळाडू एकत्र येऊन देशाच्या क्रीडा क्षेत्राचा गौरव वाढवत आहेत, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

कुलविंदर सिंग गिल म्हणाले, महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेच्या माध्यमातून राज्यातील मुलांच्या आणि मुलींच्या संघांची राष्ट्रीय स्तरावरील कामगिरी सातत्याने उंचावत असून, खेळाडू राष्ट्रीय पदकांसह आंतरराष्ट्रीय स्तरावरही देशाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांतून उभारण्यात येत असलेल्या बास्केटबॉल स्टेडियममध्ये आगामी काळात राष्ट्रीय स्पर्धेबरोबरच आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेचेही आयोजन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी प्रास्ताविक केले.

युवा राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशचे विजेतेपदावर शिक्कामोर्तब

४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेच्या (मुख्यमंत्री चषक) पारितोषिक वितरण समारंभात वैयक्तिक आणि सांघिक गटातील विजेत्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला. मुलींच्या गटात तामिळनाडूने, तर मुलांच्या गटात उत्तर प्रदेशने विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात कर्नाटक संघाला उपविजेतेपद मिळाले. मुलांच्या गटात मध्य प्रदेश संघाने उपविजेतेपद मिळविले. यावेळी जपान येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीमध्ये रौप्यपदक मिळविणाऱ्या महाराष्ट्राच्या यशदीप भोगे याचाही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

IND vs NZ: किवींचा खेळ खल्लास! विराट कोहलीची वादळी खेळी अन् अर्शदीपचा भेदक मारा; टीम इंडियाने न्यूझीलंडला लोळवले

Web Title: Devendra fadnavis on khelo india rural sports development at 41st youth national basketball championship pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 06:04 PM

Topics:  

  • CM Devendra Fadanvis
  • devendra fadanvis
  • Khelo India tournament
  • maharashtra

संबंधित बातम्या

Maharashtra Farmers: शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार! 73 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 5000 रुपये जमा; उर्वरित शेतकऱ्यांना कधी मिळणार?
1

Maharashtra Farmers: शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार! 73 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 5000 रुपये जमा; उर्वरित शेतकऱ्यांना कधी मिळणार?

पुणे हादरलं! बर्फाचा गोळा घेण्याच्या बहाण्याने घरात शिरून मुलींचा विनयभंग; नराधम शिक्षकाला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
2

पुणे हादरलं! बर्फाचा गोळा घेण्याच्या बहाण्याने घरात शिरून मुलींचा विनयभंग; नराधम शिक्षकाला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Pune Metro: ‘पुणे 2030 पर्यंत देशातील मोठे…’; CM Devendra Fadnavis यांनी व्यक्त केला विश्वास
3

Pune Metro: ‘पुणे 2030 पर्यंत देशातील मोठे…’; CM Devendra Fadnavis यांनी व्यक्त केला विश्वास

Maharashtra Politics: ‘तुझा बाप सरड्यासारखे रंग बदलतो’, थोरवेंच्या आक्रमक वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
4

Maharashtra Politics: ‘तुझा बाप सरड्यासारखे रंग बदलतो’, थोरवेंच्या आक्रमक वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.