Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हायवेवर ओव्हरलोडिंग करणाऱ्यांची खैर नाही! केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 15 एप्रिलपासून ‘हे’ नवीन नियम लागू

नॅशनल हायवेवर ओव्हरलोडिंग करणाऱ्या वाहनांसाठी केंद्र सरकारने नवीन दंड नियमावली जाहीर केली आहे. 40 टक्क्यांहून अधिक ओव्हरलोड असल्यास ४ पट टोल द्यावा लागणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 14, 2026 | 06:37 PM
हायवेवर ओव्हरलोडिंग करणाऱ्यांची खैर नाही! (Photo Credit- X)

हायवेवर ओव्हरलोडिंग करणाऱ्यांची खैर नाही! (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

  • हायवेवर ओव्हरलोडिंग करणाऱ्यांची खैर नाही!
  • केंद्र सरकारचा मोठा निर्णय
  • 15 एप्रिलपासून ‘हे’ नवीन नियम लागू
नॅशनल हायवेवर क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेणाऱ्या वाहनचालकांना आता मोठा आर्थिक फटका बसणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ओव्हरलोडेड वाहनांसाठी टोल शुल्काबाबत नवीन नियमावली जाहीर केली आहे. ‘राष्ट्रीय महामार्ग शुल्क (दर निश्चिती आणि संकलन) चौथी दुरुस्ती नियम, 2026’ अंतर्गत हे बदल करण्यात आले असून, उद्यापासून म्हणजेच 15 एप्रिल 2026 पासून यांची अंमलबजावणी सुरू होईल.

नव्या नियमांनुसार असा असेल दंड

सरकारने आता दंडाची आकारणी ही ओव्हरलोडिंगच्या टक्केवारीनुसार निश्चित केली आहे. त्याचे स्वरूप खालीलप्रमाणे असेल:

  • 10 टक्क्यांपर्यंत ओव्हरलोड: जर वाहनावर निर्धारित क्षमतेपेक्षा 10 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त वजन असेल, तर कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.
  • 10 ते 40 टक्क्यांपर्यंत ओव्हरलोड: अशा वाहनांकडून मूळ टोल दराच्या (Base Rate) दोन पट दंड वसूल केला जाईल.
  • 40 टक्क्यांहून अधिक ओव्हरलोड: अशा वाहनांना मूळ टोल दराच्या तब्बल चार पट दंड भरावा लागेल.

Vehicle Sales: भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठी झेप! प्रवासी वाहनांच्या विक्रीत 16 टक्क्यांची वाढ; दुचाकी आणि तिचाकी वाहनांचीही धूम

टोल नाक्यावरच होणार वजनाची मोजणी

महामार्गावरील टोल प्लाजावर बसवलेल्या प्रमाणित वजन यंत्रांच्या मदतीने ओव्हरलोडिंगची तपासणी केली जाईल. विशेष म्हणजे, ज्या टोल नाक्यावर वजनाची सुविधा नसेल, तिथे हा अतिरिक्त दंड आकारला जाणार नाही. आधुनिक ‘वेट-इन-मोशन’ (WIM) तंत्रज्ञानामुळे वाहन चालत्या स्थितीत असतानाच त्याचे वजन मोजणे शक्य होणार आहे, ज्यामुळे वेळ वाचेल आणि प्रक्रियेत पारदर्शकता येईल.

फास्टॅग (FASTag) आणि ‘वाहन’ पोर्टलची जोड

ओव्हरलोडिंगचा दंड केवळ फास्टॅगच्या माध्यमातूनच कापला जाईल. तसेच, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांची संपूर्ण माहिती ‘राष्ट्रीय वाहन रजिस्टर’ (Vahan) मध्ये नोंदवण्यात येईल. ज्या वाहनांकडे वैध फास्टॅग नसेल, त्यांच्यावर सध्याच्या नियमांनुसार कठोर कारवाई केली जाईल.

हायवे सुरक्षेसाठी उचललेले पाऊल

रस्त्यांची दुरवस्था रोखणे आणि रस्ते अपघात कमी करणे, हा या नव्या नियमांचा मुख्य उद्देश आहे. ओव्हरलोडिंगमुळे हायवेच्या पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. नवीन नियमांमुळे मालवाहतूक अधिक शिस्तबद्ध आणि सुरक्षित होईल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे. काही सुरू असलेल्या खासगी प्रकल्पांसाठी संबंधित कंपन्यांच्या संमतीनंतरच हे नियम लागू होतील.

Car Buying Guide: नवीन गाडी खरेदी करण्याचा विचार करताय? थांबा, या गोष्टी लक्षात ठेवा नाही तर रिकामा होईल खिसा

Web Title: National highway overload vehicle new toll rules india 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 06:37 PM

Topics:  

  • Central Governement
  • National Highways
  • Toll

संबंधित बातम्या

SSC GD कॉन्स्टेबलची पुनरपरीक्षा जाहीर; पण २९ मे रोजी होणारा हा पेपर नेमका कोणत्या उमेदवारांसाठी आहे ?
1

SSC GD कॉन्स्टेबलची पुनरपरीक्षा जाहीर; पण २९ मे रोजी होणारा हा पेपर नेमका कोणत्या उमेदवारांसाठी आहे ?

भारतात ‘इबोला’ व्हायरसचा हाय अलर्ट! केंद्र सरकारकडून ट्रॅव्हल ॲडव्हायझरी जारी; आफ्रिकेत ‘ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी’ घोषित
2

भारतात ‘इबोला’ व्हायरसचा हाय अलर्ट! केंद्र सरकारकडून ट्रॅव्हल ॲडव्हायझरी जारी; आफ्रिकेत ‘ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी’ घोषित

UPSC Prelims 2026:यूपीएससीचा ऐतिहासिक निर्णय! परीक्षा संपताच अवघ्या एका आठवड्यात ‘आन्सर की’ जाहीर होणार?
3

UPSC Prelims 2026:यूपीएससीचा ऐतिहासिक निर्णय! परीक्षा संपताच अवघ्या एका आठवड्यात ‘आन्सर की’ जाहीर होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.