
टोल कर्मचाऱ्याने कापू पाहिलं खोटं चलन, चालकाने धरला हात अन् चालू गाडीतच सपासप हाणलं कानशिलात; Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात टोल कर्मचारी ट्रकचालकाकडे टोल मागताना दिसतो. कर्मचारी खोटं चलान मागत असल्याचे ट्रकचालकाला समजते आणि म्हणूनच गाडी न थांबवता तो सरळ पुढे निघून जातो. यात घडतं असं की, टोल कर्मचारी ट्रकचालकाचा पाठलाग करु पाहतो. पैसे घेतल्याशिवाय तो ट्रकचालकाला पुढे जाऊन देण्यास तयार नसतो. यासाठी तो ट्रकचालाकाला गाडी थांबवण्यासाठी आवाज देतो आणि नंतर थेट चालू गाडीत खिडकीला लटकून तो चालकाकडून चलन मागायला सुरुवात करतो. या क्षणी चालक भडकतो आणि सपासप कर्मचाऱ्याला कानशिलात बडवण्यास सुरुवात करतो. चालक इतक्या ताकदीने कर्मचाऱ्यावर हल्ला करतो की पाहून यूजर्सच्या अंगावर काटा येतो. ही घटना आता इंटरनेटवर चांगलीच ट्रेंड करत आहे.
Aura of the Truck Driver 🔥🔥 Aur lelo Unauthorised Toll A suspected fake toll collector tried to collect money truck drivers, but got the ultimate treatment. https://t.co/FzGDO1lrVL — Amit Singh (@RockstarAmit) October 15, 2026
दरम्यान घटनेचा हा व्हिडिओ @RockstarAmit नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला ७ लाखाहून अधिकचे व्यूज मिळाले असून व्हिडिओवर अनेक यूजर्सने कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “बरोबर केलं त्याने त्याच्यासोबत, मेहनत न करता जर तुम्ही खोटेपण करणार तर असंच होणार”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ड्रायव्हर गाडी चालवताना व्हिडिओ रेकॉर्ड करतोय… मार बसण्यापूर्वी अतिप्रतिक्रिया देतोय… पक्कं स्क्रिप्टेड”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “ट्रक ड्रायव्हर्सना आधीच इतक्या बनावट टोल आणि तपासणी नाक्यांचा सामना करावा लागतो की हे कधी ना कधी घडणारच होतं. त्या पिवळ्या वेस्टवाल्याला खरंच वाटलं की त्याला एक सोपं लक्ष्य मिळालं आहे आणि आपला हा सिद्धांत तपासण्यासाठी त्याने चुकीचा ट्रक निवडला.”.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.