फोटो सौजन्य: @wheels_craze (X.com)
भारतात मोठ्या प्रमाणात बाईकची विक्री होत असते. पूर्वी बाईक खरेदी करताना लोक फक्त बाईकच्या किंमतीकडे लक्ष द्यायचे. पण आज ही स्थिती बदलली आहे. आजचा ग्राहक बाईक खरेदी करताना फक्त किंमतीकडेच लक्ष देत नाही तर त्याच्या लूक आणि परफॉर्मन्सकडे सुद्धा लक्ष देतो. म्हणूनच आजच्या दुचाकी उत्पादक कंपन्या दमदार लूक असणाऱ्या बाईक लाँच करत असतात. यातीलच एक कंपनी म्हणजे होंडा.
होंडाने देशात अनेक उत्तम बाईक लाँच केल्या आहेत. त्यातही काही बाईक्सचे लूक कंपनीने असे ठेवले आहेत की त्यांना पाहताच क्षणी बाईक प्रेमींना भुरळ पडेल. कंपनीने 19 फेब्रुवारीला म्हणजेच आज 2025 2025 Hornet 2.0 बाईक लाँच केली आहे. या बाईकमध्ये कोणते बदल केले आहेत? किती शक्तिशाली इंजिन आणि फीचर्स त्यात देण्यात आली आहेत. बाईक किती किमतीला खरेदी केली आहे? त्याबद्दल आज आपण जाणून घेऊया.
2025 मध्ये Renault ने ‘या’ 2 कार केल्या अपडेट, किंमतीत सुद्धा केले बदल? जाणून घ्या
होंडाने Hornet 2.0 व्हर्जन अनेक अपडेटसह लाँच केली आहे. सध्याच्या बाईकच्या तुलनेत या बाईकमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत, ज्यामुळे ती आता पूर्वीपेक्षा चांगली झाली आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, नवीन बाईकमधील इंजिन अपडेट करण्यात आले आहे आणि आता ते OBD2B बेस्ड असणार आहे. यासोबतच यामध्ये अनेक फीचर्स देखील या नवीन बाईकमध्ये देण्यात आले आहेत.
होंडा हॉर्नेट 2.0 बाईक 184.40 सीसी क्षमतेच्या सिंगल सिलेंडर इंजिनने सुसज्ज आहे. ज्यामुळे बाईकला 12.50 किलोवॅटची पॉवर आणि 15.7 न्यूटन मीटरचा टॉर्क मिळतो. यात 5 स्पीड गिअरबॉक्स आहे. तसेच यात असिस्ट आणि स्लिपर क्लच देखील देण्यात आले आहेत, ज्यामुळे गिअर शिफ्टिंग पूर्वीपेक्षा चांगले झाले आहे.
एलोन मस्क आणि पंतप्रधान मोदींची भेट, आता Tesla च्या ‘या’ कार भारतात एंट्री मारण्यास सज्ज?
बाईकमध्ये अनेक उत्तम फीचर्स देण्यात आली आहेत. यात एलईडी लाईट्स आणि 4.2 इंचाचा टीएफटी स्क्रीन आहे. ज्यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कॉल अलर्ट, एसएमएस नोटिफिकेशन, टाइप सी चार्जिंग पोर्ट, ड्युअल चॅनेल एबीएस, होंडा सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल सारखी फीचर्स देण्यात आली आहेत. तसेच, नवीन ग्राफिक्ससह बाईकला नावीन्य देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
होंडा हॉर्नेट 2.0 बाईक चार रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे – पर्ल इग्नियस ब्लॅक, रेडियंट रेड मेटॅलिक, अॅथलेटिक ब्लू मेटॅलिक आणि मॅट अॅक्सिस ग्रे मेटॅलिक. ही बाईक 1.57 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत खरेदी करता येईल. ही होंडा बाईक Honda Red Wing आणि Big Wing डीलरशिपद्वारे खरेदी केले जाऊ शकते.
ही नवीन बाईक भारतीय बाजारात 200 सीसी सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. या सेगमेंटमध्ये, ही बाईक थेट TVS Apache RTR 200, Baja Pulsar 200 सारख्या बाईक्सशी स्पर्धा करेल.